पुणे

कचरा व्यवस्थापनासाठी ''मायक्रो प्लॅन''

CD

आळंदी, ता. १३ : पुणे जिल्ह्यातील १८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या घनकचरा व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे. या गटाला ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या तज्ज्ञ समितीमध्ये आळंदीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, तळेगावचे गिरीश दापकेकर आणि फुरसुंगी-उरुळी देवाचीचे प्रसाद शिंगटे यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नागरी संस्थांमध्ये कचरा संकलन, वर्गीकरण आणि प्रक्रिया व्यवस्था अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे.
हा गट स्थानिक भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करून उपाययोजना सुचवणार आहे. यात १०० टक्के कचरा संकलन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, प्लास्टिक व बांधकाम कचरा व्यवस्थापन यावर भर दिला जाईल. तसेच लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांच्या सहभागातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाणार आहे. नाले, बाजारपेठा आणि शाळा परिसराच्या स्वच्छतेसोबतच कचरा वर्गीकरणाबाबत व्यापक जनजागृती या मोहिमेद्वारे केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT