पुणे

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना गती ------------

CD

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर जलसंधारणाच्या कामांना गती

जिल्ह्यातील १४०५ ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांचे नियोजन

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यात जलसंधारण, पाणी पुनर्भरण आणि रोजगारनिर्मितीच्या कामांना गती देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्ही. बी. जी. राम जी. अंतर्गत प्रस्तावित कामांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील विविध विभागांना कामांचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. जिल्ह्यातील १ हजार ४०५ ग्रामपंचायतींमध्ये गावनिहाय गरजेनुसार कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

दुष्काळी परिस्थितीत गावपातळीवर पाण्याची उपलब्धता वाढविणे, पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करणे, यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्याचाही या कामांमागील उद्देश आहे.

या अभियानात ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभाग, मृद्‍ व जलसंधारण विभाग, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागांचा समावेश आहे. ग्रामपंचायत स्तरावर शोषखड्डे, विहीर पुनर्भरण, नाडेप आणि गांडूळ खत प्रकल्पांसाठी प्रत्येकी १४ हजार ५० कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी ४ हजार २१५, तर पाणंद रस्त्यांसाठी १ हजार ४०५ कामांचे नियोजन आहे. याशिवाय जलतारा आणि मातोश्री पाणंद रस्त्यांची कामेही प्रस्तावित आहेत.

विविध विभागांमार्फत पाझर तलावांमधील गाळ काढणे, तलावांची दुरुस्ती, नाल्यांचे सरळीकरण व खोलीकरण, दगडी बांध, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन स्ट्रक्चर, नाला बंडिंग आणि मातीनाला बांध ही कामे करण्यात येणार आहेत. यातील दगडी बांध, कंपार्टमेंट बंडिंग, गॅबियन स्ट्रक्चर, नाला बंडिंग आणि मातीनाला बांध या प्रत्येक कामासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत दोन कामे, याप्रमाणे प्रत्येकी २ हजार ८१० कामांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पाझर तलावांमधील गाळ काढणे आणि दुरुस्तीमुळे पाणीसाठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच उपलब्ध बंधाऱ्यांच्या ठिकाणी नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे नियोजन आहे. सामाजिक वनीकरण विभागाला वैयक्तिक वृक्ष लागवडीसाठी २ हजार ८१० कामांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन रोपवाटिकाही उभारण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाणंद रस्ते आणि मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. शासनाकडून मंजूर झालेली कामे कामांच्या शेल्फवर ठेवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.
-------------
चौकट
गरज लक्षात घेऊन कामांची निवड
दरम्यान, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पाण्याची उपलब्धता, नैसर्गिक जलप्रवाह आणि गावाची गरज लक्षात घेऊन कामांची निवड केली जाणार आहे. विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून या कामांची अंमलबजावणी केल्यास जलसंधारणाला चालना मिळण्याबरोबरच दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण भागातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलिसांचा अपमान, मृतदेह डंपरमधून नेल्याने संताप; भाजप आमदारांचा जम्मू-काश्मीर पोलिसांवर हल्लाबोल

वडिलांच्याच बँकेच्या ATM मधून संकर्षणने चोरले पैसे; आठवण सांगताना म्हणाला...'आजोबामुळे वाचलो'

Marathi Language : आमची मराठी नेमकी कोणती? मिलेनियल आणि जेन झी पिढीच्या भाषेचा बदलता चेहरा

Latest Marathi News Live Update : उजनी धरणावरील कृत्रिम बुद्धिमत्ता माहिती केंद्राला विरोध तीव्र, प्रकल्प रद्द करण्यासाठी २७ नोव्हेंबरला मशाल मोर्चा

Ramlila Maidan : रामलीला मैदानावर आता ५० हजारांपेक्षा अधिक आंदोलकांना प्रवेश नाही? दिल्ली पोलिसांची नवी नियमावली प्रस्तावित

SCROLL FOR NEXT