पुणे

पाणीप्रश्‍नावरून प्रशासन धारेवर

CD

पुणे, ता. २२ : शहरात सुरू असलेल्या एक दिवसाआड पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, प्रशासनाचे नियोजन पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत नगरसेवकांनी सोमवारी (ता. २२) सर्वसाधारण सभेत प्रशासनाला धारेवर धरले. पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा दावाही लोकप्रतिनिधींनी खोडून काढला.
यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे पाणीप्रश्‍न ऐरणीवर आला आहे. तातडीची उपाययोजना म्हणून महापालिकेने जूनच्या प्रारंभापासूनच एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शहराच्या वेगवेगळ्या भागात सम व विषम पद्धतीने पुरवठा केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात समान पुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
दैनंदिन गरजांसाठीही आवश्‍यक पाणी मिळत नाही. टॅंकरही पुरविले जात नाहीत. त्यातच अनेक ठिकाणी दूषित पुरवठा होत आहे. याबरोबरच पूर्वसूचना न देता पुरवठा बंद केला जातो. त्याबाबत विचारणा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तर फोन बंद करून ठेवतात. मग नागरिकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणार तरी कोण? असा प्रश्‍न उपस्थित करत विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीही सर्वसाधारण सभेत प्रशासनास धारेवर धरले.


कोण काय म्हणाले...
- उपमहापौर परशुराम वाडेकर : भामा-आसखेड व चतुःशृंगी येथून बोपोडीला पाणीपुरवठा होतो. मात्र, अत्यंत कमी प्रमाणात पाणी दिले जात नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त असून नगरसेवकांना जाब विचारत आहेत.
- सभागृह नेते गणेश बिडकर : धरणात सध्या साडेतीन टिएमसी पाणी उपलब्ध आहे. नगरसेवकांनी पाणी समस्या मांडली आहे. शहरातील पेठांमध्ये टॅंकर जात नाही, त्यामुळे तेथील पाणी समस्या आणखी गंभीर आहे. अशा जुन्या सोसायट्या, वाडे व घरे शोधून त्यांचा पाण्याचा प्रश्‍न प्राधान्याने सोडवावा.
- विरोधी पक्षनेते नीलेश निकम : दिवसाआड पुरवठ्याबाबत प्रशासनाचा हेतू चांगला आहे. मात्र, शहरातील उपनगरे, समाविष्ट गावांमध्ये पाण्याची स्थिती बिकट आहे. दिवसाआड पुरवठ्याऐवजी आठवड्यातील दोन दिवस पुरवठा बंद ठेवावा, म्हणजे गैरसोय टळेल.
- नगरसेविका वैशाली बनकर : पाणी टंचाई आता असली, तरीही आम्ही मागील सहा महिन्यांपासून पुरवठा नियमित होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडत आहोत. आता दिवसाआड पुरवठ्यामध्ये आम्हाला पाणीच मिळत नाही. पाणी टंचाई व दूषित पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
- नगरसेवक गफुर पठाण : आमच्या प्रभागात पाणी टंचाई पूर्वीप्रमाणेच कायम आहे. दिवसाआड पाणी मिळत असले, तरी आम्हाला तीन ते चार दिवसांनी पाणी मिळते. हजारो रुपये मोजूनही पाण्याचे टॅंकर मिळत नाहीत.

धक्काबुक्कीचा निषेध :
सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर नगरसेवक गफुर पठाण यांना भाजप नगरसेवकांनी केलेल्या धक्काबुक्कीचा निषेध नोंदविला. ‘लोकशाहीत चर्चा हवी, धक्काबुक्की नको’, ‘सभागृहात झुंडशाही नव्हे, लोकशाहीची गरज’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन, घोषणा देत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आंदोलन केले.

‘‘महापालिकेने दूषित पाण्याचा प्रश्‍न तातडीने सोडवावा. पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल झालेला असल्यास नागरिकांना, नगरसेवकांना तातडीने कळवावे. टॅंकरच्या पाण्याचीही तपासणी करण्यास प्राधान्य द्यावे. पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व रेन वॉटर हार्वेस्टिंगलाही कार्यान्वित करण्यावर भर द्यावा.’’
- मंजूषा नागपुरे, महापौर

‘‘पाण्याबाबत नागरिकांच्या नगरसेवकांमार्फत येणाऱ्या तक्रारींमध्ये तथ्य आहे, हे चित्र बदलण्याची गरज आहे. नागरिकांना पाणी नियमित मिळेल, प्रभागनिहाय रचना करून पाण्याचे गणित जुळविले जाईल. पाण्याचे वेळापत्रक तंतोतंत पाळले जाईल व अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक बंद राहणार नाहीत, त्याविषयी सूचना दिल्या जातील. पाणी बचतीला सर्वाधिक प्राधान्य दिले जाईल.’’
- नवलकिशोर राम, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Inflation Impact: मॉन्सूनची मंद वाटचाल! महागाईचा मोठा फटका बसणार; जाणून घ्या कोणत्या वस्तू महागणार? सामान्यांच्या बजेटवर संकट

Post-Pregnancy Guidelines: मातृत्व की करिअर? महिला क्रिकेटपटूंचा गोंधळ मिटवण्यासाठी ICC चा ऐतिहासिक निर्णय; नियमावली जाहीर

Lucknow Fire: ''वाचवा..वाचवा...!''छताचा दरवाजा लॉक अन् निष्पाप मुलं जिवाच्या आकांताने ओरडत होते; लखनऊ जळीतकांडाचा थरारक अनुभव

Latest Marathi News Live Update: पुण्याला यलो अलर्ट, पुढील चार दिवसात पावसाचा अंदाज

रात्रीची वेळ, एसटी बसमध्ये अंधार; कंडक्टरचं महिलेशी गैरवर्तन, वाशिम-छत्रपती संभाजीनगर बसमधील प्रकार...

SCROLL FOR NEXT