पुणे

हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्या

CD

पुणे, ता. १२ : हुंड्यासाठी छळ केल्याने महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पतीला अटक करण्यात आली असून, सासूसह दिराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विद्या अमोल तेलंग (वय २५, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती अमोल ज्ञानोबा तेलंग (वय २८, रा. पापडे वस्ती, फुरसुंगी, हडपसर) याला अटक करण्यात आली. याबाबत संभाजी वडनमवार (वय ५५, रा. इस्लामपूर, ता. किनवट, जि. नांदेड) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या हिचा मे मध्ये अमोलशी विवाह झाला होता. विवाहानंतर माहेरहून दागिने तसेच पैसे आणण्यासाठी पती, सासू, दिराने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. छळ असह्य झाल्याने तिने नऊ ऑगस्टला राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बँकांचा ३ दिवसांचा संप मागे! बैठकीनंतर रात्री उशिरा निर्णय; काय झाली चर्चा?

विश्रांतवाडीत ११ वर्षीय मुलीवर हातपाय बांधून अत्याचाराचे आरोप, ५२ वर्षांच्या नराधमाला अटक; रस्ता रोको आंदोलन

Divya Shinde Arrest : बिग बॉस मराठी फेम अभिनेत्रीची पोलीस कोठडीत रवानगी, डॉक्टरसोबत का झालेला वाद?

Virat Kohli Records: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; जगात असा पराक्रम कुणी केला नव्हता, गावस्करांच्या विक्रमाशीही बरोबरी

Pune Crime: गणेश विसर्जन मिरवणुकीतील गर्दीत चोरट्यांचा डल्ला; पुण्यात १४ घटनांत ९.७७ लाखांचे दागिने लंपास

SCROLL FOR NEXT