येरवडा कारागृहातील बंद्यांच्या स्वंयरोजगारासाठी कर्जपुरवठा Sakal
पुणे

येरवडा कारागृहातील बंद्यांच्या स्वंयरोजगारासाठी कर्जपुरवठा; महाराष्ट्र बँकेचा उपक्रम

देशातील पहिला उपक्रम असल्याचा दावा

सकाळ वृत्तसेवा

लोहगाव : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील बंदयांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जपुरवठा करण्याच्या महाराष्ट्र बँकेने सुरू केलेल्या योजनेचा प्रारंभ मंगळवारी (ता. ७) करण्यात आला.

यावेळी कारागृह महानिरीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, प्रभारी उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ, येरवडा कारागृह अधीक्षक राणी भोसले, उपअधीक्षक प्रदीप जगताप, महाराष्ट्र बँकेचे अंचल प्रबंधक विवेक धवन, कार्यकारी संचालक विवेककुमार, बँकेच्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक संजय मांढरे उपस्थित होते.

या उपक्रमाचे उदघाटन केल्यावर विवेक धवन म्हणाले, की अशी अभिनव योजना राबविणारे महाराष्ट्र हे कदाचित देशातील पहिले राज्य असावे. कारागृह महानिरीक्षक कुलकर्णी म्हणाले, केंद्र सरकार ग्रामीण विकास मंत्रालयांतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राष्ट्रयीकृत बँकांमार्फत विविध प्रकारचे स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबवित आहे. कारागृहातील बंदयांनी विशेषतः महिला बंदयांनी हे प्रशिक्षण घेतल्यास कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात येईल. यामुळे बंदयांना स्वतःच्या पायावर उभे राहून कुटुंबाचा चरिथार्थ चालवण्यास मदत होईल.

महाराष्ट्र बँकेचे विजयकुमार म्हणाले, देशातील राष्टीयकृत बँका मोठ्या प्रमाणात कर्जमेळावे घेऊन लहानातील लहान उद्योगासाठी कर्जपुरवठा करून नागरिकांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT