Punekar enjoy New Year party but Conditions apply says Pune Police 
पुणे

पुणेकरांनो नववर्षाचे स्वागत "एन्जॉय' करा; पण...- पुणे पोलिस

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांनी नववर्षाचे आनंदोत्साहात स्वागत करावे. त्यांच्या सुरक्षितेसाठी पोलिस रस्त्यांवर असणार आहेत. मात्र आपण आनंद साजरा करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी तब्बल साडे सहा हजार ते सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी रात्री पुणेकर मोठ्या संख्येने रस्त्यावर गर्दी करणार आहेत. पुणे पोलिसांकडून नागरीकांना नववर्षाचा आनंद घेण्यासाठी खास शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पुणेकरांच्या सुरक्षिततेलाही पोलिसांकडून प्राधान्य देण्यात आले आहे. पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारीही मंगळवारी रात्रीपासून बुधवारी पहाटेपर्यंत बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहेत.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात, 'गांभीर्यपूर्वक...

पोलिसांच्या रडारवर रेव्ह पार्ट्या, गर्दुल्ले अन्‌ मद्यपी वाहनचालक ! 
शहराच्या काही भागात व उपनगरांमध्ये नववर्षानिमित्त रेव्ह पार्ट्या होण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने गुन्हे शाखेकडून अशा रेव्ह पार्ट्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याबरोबरच मद्यपान करुन वाहने चालविणारे व अंमली पदार्थांचे सेवन करणारेही पोलिसांच्या "रडार'वर असणार आहेत. गुन्हे शाखेची दहा पथके कार्यरत असून त्यापैकी तीन पथके अंमली पदार्थांबाबतची कारवाई करणार आहेत. याबरोबरच महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकही रात्रभर रस्त्यावर असणार आहे. 

शरद पवारांचे धक्कातंत्र; 'या' विश्वासू नेत्याला दिले गृहमंत्री पद?

...असा असेल पोलिस बंदोबस्त 
- अतिरीक्त पोलिस आयुक्त - 3 
- पोलिस उपायुक्त - 10 
- सहाय्यप पोलिस आयुक्त - 20 
- पोलिस निरीक्षक - 80 
- सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, वाहतुक पोलिस व पोलिस कर्मचारी - सहा हजार 900 

"पुणेकरांना नववर्षासाठी शुभेच्छा. पुणेकरांनी नववर्षाचा आनंद साजरा करावा. दुसऱ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पोलिस तुमच्या मदतीसाठी आहेत. परंतु वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करु नये, मद्यपान करुन वाहने चालवु नयेत. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.'' - पोलिस आयुक्त. डॉ.के.वेंकटेशम, पोलिस आयुक्त

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आग; आगीची तीव्रता कमी, आगीचे कारण अस्पष्ट


"नागरीकांची व महिलांची सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. मंगळवारी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असेल. नागरीकांना कुटुंबासह नववर्षाचा अधिकाधिक आनंद घेता यावा, यासाठी शहरात सर्वत्र पोलिस रस्त्यावर असणार आहेत.'' - डॉ.रविंद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT