पुणे

#WeCareForPune कोरोनाला पिटाळण्यास पुणेकर सज्ज!

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘आमच्या सोसायटीत परदेशातून आलेले नागरिक आहेत, आम्हाला त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल?’, ‘या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?’, ‘नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करावयाचे आहे. ते कशा प्रकारे करावे?..’ हे प्रश्‍न आहेत जागरूक पुणेकरांचे. या प्रश्‍नांची उत्तरे आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून घेऊन त्यादृष्टीने कार्यवाही केली जात आहे. यावरून पुणेकर कोरोनाला पिटाळण्यास सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. पुण्यातही आतापर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षदेखील सुरू करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात घाबरलेले पुणेकर आता जागृतपणे या आजाराशी लढा देण्यासाठी पुढे येऊ लागले असल्याचे या कक्षाला दररोज येणाऱ्या दूरध्वनीवरून समोर आले आहे. या आजारासंदर्भात काय उपाययोजना कराव्यात, याची माहिती घेणारे दररोज शेकडो दूरध्वनी येत आहेत. 

सोसायटीत परदेशात जाऊन आलेले नागरिक आहेत. त्यांची माहिती देण्याबराबेरच त्यांना आम्हाला मदत करावयाची आहे. ती आम्ही कशा प्रकारे करू शकतो, येथपासून या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, काळजी कशी घ्यावी, येथपर्यंत माहिती घेणारे दूरध्वनी कक्षाकडे येत आहेत. सामाजिक भावनेतून मदतीची तयारी दर्शविणारे देखील त्यामध्ये काही दूरध्वनी असल्याचे या कक्षातील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.

रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार
आपत्ती व्यवस्थापन कक्षात कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची शंका व्यक्‍त करणारे देखील काही नागरिकांचे दूरध्वनी येत आहेत. अशा व्यक्तींना तातडीने मदत करण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आली आहे. तातडीने त्या नागरिकाच्या घरी भेट देऊन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. आवश्‍यकता भासल्यास डॉ. नायडू रुग्णालयात नेऊन उपचार करून पुन्हा घरी सोडण्यापर्यंतची मदत त्यांना केली जात आहे. याशिवाय समुपदेशन टीमदेखील तयार करण्यात आली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख गणेश सोनुने यांनी सांगितले.

अशी घ्या काळजी
    सर्वांना मास्कची गरज नाही 
    संसर्ग टाळण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीशी लांबून संवाद साधा
    आजारी लोकांना भेटणे टाळा 
    नाक, डोळे, तोंड यांना वारंवार स्पर्श करू नका
    सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये
    कक्षात आठ दिवसांत एक हजारांहून अधिक दूरध्वनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT