sant-tukaram-nagar-metro-work 
पुणे

#PuneMetro:पुणे-पिंपरी चिंचवडमधील ‘प्रायोरिटी सेक्‍टर’च्या मार्गांच्या कामांना वेग

मंगेश कोळपकर ः सकाळ वृत्तसेवा

पुणे -  पिंपरी-फुगेवाडी आणि वनाज-गरवारे महाविद्यालयादरम्यानचे ‘प्रायोरिटी रूट’ काम पूर्ण करण्यासाठी महामेट्रोने वेग घेतला आहे. पिंपरी चिंचवडमधील सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून शहरातील काम सुमारे ५० टक्‍क्‍यांवर पोचले आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पासाठी सुमारे ११ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. दोन्ही शहरातील ३१ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. पिंपरी चिंचवडमधील पहिल्या टप्प्यातील मेट्रोमार्गाचे काम डिसेंबर अखेर तर शहरातील पहिल्या टप्प्याचे काम पुढीलवर्षी मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन पालकमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपरी-चिंचवडमधील संत तुकारामनगर स्थानकाचे सुमारे ९० टक्के तर, फुगेवाडी स्थानकाचे काम ८० टक्के आणि पिंपरी चिंचवड स्थानकाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. सुमारे ६.५ किलोमीटरच्या या मार्गावर तीन स्थानके असतील. तर कर्वे रस्त्यावर वनाज-कर्वेनगर दरम्यानच्या सुमारे पाच किलोमीटरच्या मेट्रो मार्गावरील वनाज, आनंदनगर आणि गरवारे महाविद्यालय यांचीही कामे प्रत्येकी अनुक्रमे ५०, ५० आणि ३० टक्के पूर्ण झाली आहेत. 

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्या टप्प्यातील संपूर्ण मार्गावर लोहमार्ग टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे तर, पुण्यामध्ये २.५ किलोमीटर काम पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सिग्नलिंग आणि ओव्हरहेड केबल टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. दोन्ही मार्गांसाठी दिलेल्या ‘डेडलाईन’मध्ये काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही महामेट्रोने नमूद केले.

कात्रज-स्वारगेट मार्ग ‘अडकला’
स्वारगेट-कात्रज दरम्यानचा विस्तारित मेट्रोमार्ग भूमिगत पद्धतीने करण्याचे महापालिका, महामेट्रो आणि राज्य सरकारने ठरविले आहे. त्यासाठी ३१०० कोटी रुपये खर्च येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येकी २० टक्के आणि महापालिकेने १० टक्के निधी देणे अपेक्षित आहे. उर्वरित ५० टक्के निधी महामेट्रो कर्जाच्या स्वरूपात उभारणार आहे. परंतु, याबाबतचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झालेला नाही. महापालिकेत ठराव मंजूर केव्हा होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनुष्यबळ वाढले 
प्रायोरिटी सेक्‍टरमधील कामांची डेडलाईन जवळ आल्यामुळे महामेट्रोने कामाचा वेग वाढविला आहे. दोन्ही शहरांत सध्या ४५०० कामगार काम करीत आहेत. आणखी एक हजार कामगार उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन महिन्यांपर्यंत मनुष्यबळाअभावी मेट्रोच्या कामाला मोठा फटका बसला होता. त्यावेळी मजुरांची संख्या १३०० पर्यंत खालावली होती. तुलनेने आता परिस्थिती सुधारली असल्याचे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

Fraud Case: डॉक्टरची 2 कोटी 24 लाखांची फसवणूक, ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे उकळल्याचा आरोप

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

SCROLL FOR NEXT