Punjabi Cultural Association welcomes American senior bike rider at pune
Punjabi Cultural Association welcomes American senior bike rider at pune Sakal
पुणे

US Bike Rider : अमेरिकन ज्येष्ठ बाइक रायडरचे जल्लोषात स्वागत; द पंजाबी कल्चर असोसिएशनचा उपक्रम, पुणेकर गेले भारावून

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : वयाच्या साठी नंतर हाडे ठिसूळ होणे, सांध्यांचे दुखणे वाढणे तसेच तत्सम आजाराला बळी पडताना आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या आ वासून उभ्या आहेत. मात्र पुण्यात दाखल झालेल्या अमेरिकन ज्येष्ठ नागरिक बाइक रायडरचा उत्साह पाहून पुणेकर भारावून गेले.

भारत भ्रमंतीसाठी २९ जानेवारीपासून अमेरिकन ज्येष्ठ नागरिक बाइक रायडरनी भारतातील सहा राज्यांत प्रवास सुरू केला आहे. या उपक्रमात सुमारे २४ अमेरिकन ज्येष्ठ नागरिकांसह काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे यात वय वर्षे ७० ते ७५ पुढील सहा महिलांचा विशेष सहभाग होता. या उपक्रमाची सुरुवात त्यांनी नाशिक येथून केली. पुढे औरंगाबाद, नागपूर, कान्हा, नॅशनल पार्क, सांची, आग्रा, जयपूर, बिकानेर, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, पालनपूर, ढोलवीरा, सापुतारा, पुण्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देत हा प्रवास करण्यात आला.

पुण्यातून ते मार्गस्थ झाले असून, गोवा येथे ही भ्रमंती थांबणार आहे. त्यांचे प्रोत्साहन वाढविण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच पुण्यात सॅलिसबरी पार्क येथे द पंजाबी कल्चर असोसिएशनच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

तसेच विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देत सन्मान व कौतुक करण्यात आले. भारतीय लोकांचे प्रेम व आपुलकी पाहून अमेरिकन ज्येष्ठ नागरिक आनंदाने भारावून गेले.

कार्यक्रमाचे आयोजन असोसिएशनचे अध्यक्ष कश्मीर नागपाल यांनी केले. माजी अध्यक्ष अशोक अग्रवाल, उपाध्यक्ष अरुण चोप्रा, सचिव सुभाष कोहली, खजिनदार विरमित सिंग मैंनी, समन्वयक विनोद बजाज आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT