punjabi singer sidhu moose wala murder case update pune police arrest accused Siddhesh Kamble as Saurabh Mahakal junnar
punjabi singer sidhu moose wala murder case update pune police arrest accused Siddhesh Kamble as Saurabh Mahakal junnar  Sakal
पुणे

सिद्धू मुसेवाला खून प्रकरण : एका गुन्हेगारास पुणे ग्रामीण पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंजाबचे प्रसिद्ध गायक व कॉंग्रेस पक्षाचे नेते सिद्धु मुसेवाला खुन प्रकरणात सहभागी असलेल्या पुणे जिल्ह्यातील दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्‍या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी सिद्धेश कांबळे ऊर्फ सौरभ महाकाळ (रा. मढ, पारगाव, जुन्नर) यास बेड्या ठोकल्या असून त्याचा साथीदार संतोष जाधव हा अद्याप फरारी आहे.

सिद्धु मुसेवाला हे 29 मे रोजी त्यांच्या सहकाऱ्यांसह पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावातुन त्यांच्या कारमधून जात होते. त्यावेळी त्यांचा पाठलाग करीत टोळक्‍याने त्यांच्यावर भरदिवसा गोळ्या झाडून त्यांची खुन केली होती. या घटनेचे पंजाबमध्ये तीव्र पडसाद उमटले असतानाच, केंद्रीय गृहमंत्रालयाने देखील या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन या प्रकरणाचा तपास स्वतंत्र पथकामार्फत करण्याचा आदेश दिला होता. दरम्यान, दिल्लीतील गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने त्याच्या सहकाऱ्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुसेवाला यांची केल्याचे त्याच्या चौकशीतुन पुढे आले. हत्या करणाऱ्यांमध्ये पंजबामधील 3, राजस्थानातील तीन व पुण्यातीन संतोष जाधव व सौरभ महाकाळ या दोघांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.

दरम्यान, पंजाब पोलिसांनी तिघांना यापुर्वी अटक केली आहे. त्यानंतर सतर्क झालेल्या पुणे ग्रामीण पोलिस जाधव व महाकाळ याच्या मागावर होते. मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित महाकाळ पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके व त्यांच्या पथकाने महाकाळ यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यास अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर केले, त्यावेळी त्यास 20 जुनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी 1 ऑगस्ट 2021 रोजी आंबेगाव तालुक्‍यात ओंकार बाणखेले याचा वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता. तेव्हापासून दोघेजण पसार होते. ग्रामीण पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मोका) कारवाई केली होती. दरम्यान, जाधव व महाकाळ पंजाब, राजस्थानात फिरून तेथेही विविध प्रकारचे गंभीर गुन्हे करीत होते. राजस्थानमधील जवाहरनगर श्रीगंगानगर येथे त्यांनी खंडणीच्या प्रकरणातुन एका व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करीत खुनाचा प्रयत्न केला होता. त्यावेळी जाधवला अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संपर्क आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT