Airport
Airport 
पुणे

संपादित होणाऱ्या जागेचे व्यवहार थांबविणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या 2 हजार 367 हेक्‍टर जागेवरील खरेदी- विक्रीचे व्यवहार थांबविण्याचा विचार जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) भूसंपादनाबाबतचे आदेश निघाल्यानंतर ही बंदी घालण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, या महिनाअखेर भूसंपादनाबाबतचे आदेश येतील, असा दावाही त्यांनी या वेळी केला.

पुरंदर तालुक्‍यातील पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या सात गावांतील जागा राज्य सरकारकडून विमानतळासाठी निश्‍चित करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मध्यंतरी झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत पुरंदर येथील नियोजित विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये जमिनीच्या मोबदल्यापोटी 2 हजार 713 कोटी रुपये, तर फळझाडे, विहिरी, ताली इत्यादीसाठी 800 कोटी रुपये अशी सुमारे 3 हजार 513 कोटी रुपये खर्चास मान्यता मिळाली आहे. आता केवळ भूसंपादनाबाबतचे आदेश राज्य सरकारकडून प्रलंबित आहेत.

या संदर्भात जिल्हाधिकारी राम म्हणाले, 'या महिनाअखेरीस भूसंपादनाबाबतचे आदेश येण्याची शक्‍यता आहे. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादित करण्यात येणाऱ्या जागेच्या खरेदी- विक्री व्यवहारावर बंदी घालण्यात येणार आहे. "एमएडीसी'कडून भूसंपादनाचे आदेश काढल्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे. गेल्या तीन वर्षांत त्या परिसरात झालेल्या खरेदी- विक्री व्यवहारांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मोबदला दिला जातो, त्यामुळे अनेकदा रक्कम वाढवून जमिनीचे खरेदी- विक्रीचे व्यवहार होतात. त्याचा तोटा सरकारला सहन करावा लागतो. हा विचार करून एमएडीसीशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.''

रिंगरोडभोवतीच्या जमिनींबाबतही निर्णय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पुण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत पीएमआरडीएच्या रिंगरोडभोवती असलेल्या जमिनींचे खरेदी- विक्रीचे व्यवहार थांबविण्याची सूचना गडकरी यांनी केली होती. त्या संदर्भात विचारले असता जिल्हाधिकारी म्हणाले, 'रिंगरोडभोवती असलेल्या जमिनींच्या खरेदी- विक्री व्यवहारांवरदेखील बंदी घालण्यात येणार आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT