Purandar-Airport
Purandar-Airport 
पुणे

पुरंदर विमानतळाचे ‘टेकऑफ’

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणा’चे (एसपीव्हीए) रूपांतर कंपनीत करण्यास नुकतीच कायद्यानुसार मान्यता मिळाली आहे. त्यामुळे यापुढे विमानतळासाठी भूसंपादन, निधीसह विविध कामे ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’च्या माध्यमातून होणार आहेत.

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला (एमएडीसी) ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मध्यंतरी या प्राधिकरणाचे विस्तारीकरण करून त्यामध्ये सिडको, पीएमआरडीए आणि एमआयडीचा समावेश करण्यात आला. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या संस्थांचा हिस्सादेखील राज्य सरकारकडून निश्‍चित कण्यात आला होता. त्यानुसार एसपीव्हीमध्ये सर्वाधिक ५१ टक्के वाटा हा सिडकोचा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा १९ टक्के आणि पीएमआरडीए व एमआयडीसीचे प्रत्येकी १५ टक्के हिस्सा असणार आहे.

विशेष नियोजन प्राधिकरणाची (एसपीव्ही) ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनी’ स्थापन करण्यासाठी एमएडीसीकडून अर्ज करण्यात आला होता. त्यास कंपनी कायद्यानुसार दोन दिवसांपूर्वी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथून पुढे विमानतळासंदर्भातील सर्व कामकाज या कंपनीमार्फत होणार आहे. या कंपनीस मान्यता मिळाल्यामुळे लवकरच अध्यक्ष व संचालक मंडळाची नियुक्ती, कंपनीच्या नावाने स्वतंत्र बॅंक खाते उघडणे, कंपनीत हिस्सेदार असलेल्या सिडको, पीएमआरडीए, एमआयडीसी आणि एमएडीसीकडून त्यांच्या हिश्‍याची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करणे आणि भूसंपादनाच्या पॅकेजला मान्यता देणे आदी कामे केली जाणार आहेत.

पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ विकसित करण्यासाठी ‘पुणे पुरंदर इंटरनॅशनल एअरपोर्ट’ या नावाने कंपनीची नोंदणी करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येथून पुढे विमानतळ उभारणीचे सर्व कामकाज या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. 
- सुरेश केकाणे, व्यवस्थापकीय उपाध्यक्ष, एमएडीसी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT