पुणे

शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला

CD

परिंचे, ता. ५ : पुरंदर तालुक्यातील दक्षिण पट्ट्यातील रुद्र गंगा व केदार गंगा या नद्यांवर असलेले तीन जलाशय तुडुंब भरून वाहत आहेत. वर्षभर पुरेल असा पाणीसाठा झाला आहे. या परिसरातील उपसा सिंचन व्यवस्थापन विभागांतर्गत येणारे पिलाणवाडी, माहूर, संगम तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या वडाची मळई जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून अनेक गावांच्या पाणी योजना व कृषी सिंचन योजनांचा पाणी प्रश्न सुटला आहे. नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. नदीकाठच्या विहिरींच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
रुद्रगंगा नदीवर वटाची मळी व पिलनवाडी जलाशय आहेत. पिलाणवाडी जलाशयाची पाणी साठवण क्षमता ६७.४४ दशलक्ष घनफूट असून ६३.८२ दशलक्ष घनफूट इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. या जलाशयातून आठ गावांना पाणीपुरवठा करणारी शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच जेजुरी महावितरण ४०० केव्ही योजना अवलंबून आहेत. या जलाशयाच्या पाण्यावर ३९९ हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी पाणीपुरवठा केला जातो. या जलाशयावर परिंचे परिसरासाठी बंद जलवाहिनीमधून कृषी सिंचन योजना केली आहे.

केदार गंगा माहूर जलाशयाची पाणी साठवण क्षमता ८४ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ६४.७२ दशलक्ष घनफूट आहे. या जलाशयावर ४३२ हेक्टर कृषी सिंचन क्षेत्राला पाणीपुरवठा केला जात असून अनेक कृषी उपसा सिंचन योजना या जलाशयावर अवलंबून आहेत. दुर्गम भागातील चार गावांना पाणीपुरवठा करणारी धनकवडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या जलाशयाच्या पाणवठ्यावर आहे. माहूरजाई पाणी वापर संस्था या जलाशयावर कार्यान्वित आहे. वर्षभर पुरेल, असे पाणी वाटपाचे नियोजन केले जाते.

केदार गंगा व रुद्र गंगा नद्यांच्या संगमावर संगम जलाशय (वीर नाला) हा सर्वात जास्त पाणी साठवण क्षमता असलेला जलाशय असून याची पाणी साठवण क्षमता ९०.२१ दशलक्ष घनफूट असून उपयुक्त पाणीसाठा ६९.६४ दशलक्ष घनफूट आहे. या जलाशयावर कृषी उपसा जलसिंचन योजना असून ३८२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.
- अविनाश जगताप, शाखा अभियंता

03107

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MCOCA: पुण्यात विषारी दारूमुळे २१ जणांचा बळी घेणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; राज्य गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

Daund News : बनावट कुणबी जात प्रमाणपत्र प्रकरणात दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द

Food Safety Crackdown: कऱ्हाडमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; दोन हॉटेल सील, तीन हॉटेलांवर दंडात्मक हालचाली

Latest Marathi News Live Update : श्रेया कालरा हिने नेटफ्लिक्सचा 'कॅप्टिव्ह' रिअ‍ॅलिटी शो जिंकला

ती सगळ्यांसमोर पाणउतारा करायची... अशोक शिंदेनी सांगितलं सेटवर कशा वागायच्या अलका कुबल; पहाटे साडे पाचला...

SCROLL FOR NEXT