पुणे

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात उंदरांचा वावर

CD

पुरी, ता.३१ (पीटीआय) : पुरी येथील जगन्नाथ मंदिरात उंदीर आणि झुरळांचा उपद्रव वाढल्याने मंदिर प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पारंपरिक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिरात कोणत्याही प्राण्याला किंवा कीटकाला मारू नये, अशा स्पष्ट सूचना असल्याने उंदीर आणि झुरळांना विषारी औषधांनी मारण्याऐवजी पिंजऱ्यांत जिवंत पकडून मंदिर परिसराच्या बाहेर सोडण्यात येणार आहे.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाचे (एसजेटीए) मुख्य प्रशासक अरविंद पाधी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या समस्येवर चर्चा करण्यात आली. मंदिरातील उंदरांचा उपद्रव नवा नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या जागतिक साथीच्या काळात भाविकांची संख्या कमी झाल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली होती. २०२३ मध्ये पारंपरिक पद्धतीने उंदरांचा बंदोबस्त करण्यात आला होता. आता पुन्हा उंदरांची संख्या वाढल्याने पिंजऱ्यांचाच अवलंब केला जाणार आहे.’’ पुरीचे जिल्हाधिकारी तसेच ‘एसजेटीए’चे उपमुख्य प्रशासक दिव्य ज्योती परिडा यांनी या समस्येबाबत भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाशी (एएसआय) चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.

झुरळांसाठी गुळाचा वापर
झुरळांना आकर्षित करून जिवंत पकडण्यासाठी गाभाऱ्यात गूळ आणि इतर चिकट पदार्थ लावलेली मातीची भांडी ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उंदीर आणि झुरळे गर्भगृहात जेथून येतात ते मार्गही बंद केले जात आहेत. देवतांना अर्पण केलेली फुले उंदीर खात असून, मौल्यवान वस्त्रे कुरतडत असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. मात्र, विषारी फवारणी करता येणार नाही. अशी फवारणी केल्यास उंदीर किंवा झुरळे मंदिरातच मरू शकतात आणि मंदिराच्या नियमांचे उल्लंघन होऊ शकते.


प्राण्यांना हातळण्याविषयी सूचना
जगन्नाथ संस्कृतीचे अभ्यासक भास्कर मिश्रा यांनी सांगितले की, गर्भगृहात उंदरांचा उपद्रव होत असला तरी सेवकांना प्राणी मारण्याची किंवा त्यांना विष देण्याची परवानगी नाही. मंदिराच्या नोंदवहीत उंदीर, वटवाघुळे आणि माकडांना कसे हाताळावे, याच्या सूचना आहेत. मंदिराच्या नियमांनुसार कोणत्याही सजीवाचा जीव घेता येत नाही. मंदिर परिसरात काही प्राणी पिढ्यान्‌पिढ्या राहत असून, त्यांना शिल्लक महाप्रसाद पुरेशा प्रमाणात मिळतो. मंदिराच्या नोंदवहीत विशिष्ट सेवकांवर उंदरांना जिवंत पकडून मंदिराबाहेर सोडण्याची जबाबदारी सोपविण्याची तरतूद असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ अब्ज लोकांना लॅपटॉप देता येईल इतका काळा पैसा; CJI सूर्यकांत यांचं मनी लॉन्ड्रिंगवर भाष्य

Vaibhav Sooryavanshi ची विकेट पडताच संघ कोसळला; अवघ्या १०५ धावांत १० फलंदाज OUT, सामना २६६-२६६ असा बरोबरीत, पुढे काय?

स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

Zomato Rules: झोमॅटोवर बनावट पनीरला नो एंट्री! Analog Dairy पदार्थांवर बंदी; रेस्टॉरंट्ससाठी कडक नियम जारी

Prakash Ambedkar on Jarange: जरांगे यांच्या आंदोलनाचे केंद्र मुंबईऐवजी दिल्लीकडे - ॲड. प्रकाश आंबेडकरांचा दावा

SCROLL FOR NEXT