Rickshw-Driver-Agitation 
पुणे

Video : कमाई नाही; हप्ते कसे भरणार? रिक्षाचालकांचा प्रश्‍न

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे ग्राहक कमी असल्याने आधीच रिक्षा व्यवसाय अडचणीत आलाय. दोन रुपये कमाई होत नाही, तर बॅंक आणि फायनान्सचे हप्ते कसे भरणार? हप्ते भरा; अन्यथा गाडी उचलून नेऊ. घरी पोलिस येतील, अशा धमक्‍या फायनान्स कंपन्यांकडून फोनवरून दिल्या जात आहेत, आम्ही आता करायचे तरी काय? अशी व्यथा रिक्षाचालकांनी व्यक्त केली. फायनान्स कंपन्यांनी गुंडागर्दी बंद करावी तसेच राज्य सरकारने रिक्षाचालकांना अनुदान द्यावे, अशी मागणी करत ‘बघतोय रिक्षावाला’ या रिक्षाचालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा प्रशासनाला विजय मल्ल्याचा फोटो भेट देऊन सरकारचा निषेध करण्यात आला.

फायनान्स कंपन्या गुंड पाठवून रिक्षाचालकांकडून कर्जाच्या हप्त्यांची रक्कम भरण्यास जबरदस्ती करत आहेत; परंतु सरकार याकडे डोळेझाक करत आहे. फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून धमक्‍या मिळत असतील, तर कर्जदारांनी विजय मल्ल्या का बनू नये? राज्य सरकारने रिक्षाचालकांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करावी. त्याशिवाय कोणीही रिक्षाचालक फायनान्स कंपनीचे हप्ते आता भरणार नाहीत, असा इशारा या वेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिला. आंदोलनात उपाध्यक्ष श्रीकांत चव्हाण तसेच मायकेल शिरसाट, विपुल मुळे यांच्यासह अन्य रिक्षाचालक सहभागी झाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

SCROLL FOR NEXT