पुणे

संक्षिप्त बातम्या

CD

राहुल गांधींविरोधातील
समन्स कोर्टाकडून रद्द
नवी दिल्ली, ता.१४ ः स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याच्या प्रकरणामध्ये लखनौच्या कनिष्ठ न्यायालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात बजावण्यात आलेले समन्स सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले आहेत. गांधी यांच्याविरोधात खटला चालविण्यासाठी आवश्यक ती परवानगी देण्यात आली नसल्याचे उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने त्यांना हा दिलासा देऊ केला आहे. लखनौचे रहिवासी असलेले नृपेंद्र पांडे यांनी त्यांच्याविरोधात लखनौच्या अतिरिक्त मुख्य महा​नगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती, त्यावर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावले होते. या समन्सला आक्षेप घेत गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये एप्रिल-२०२५ मध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने समन्स रद्द करण्यास नकार दिल्यानंतर गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
.........
चामौलीत मृतांची
संख्या सातवर
गोपेश्वर (उत्तराखंड) : चामौली जिल्ह्यातील जलविद्युत प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या बोगद्यामध्ये पाणी शिरल्याने सात कामगारांचा मृत्यू झाल्याचे समजते. आणखी तीन कामगार बेपत्ता असून त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. मायापूर (पिंपळकोटी) येथील बोगद्यात गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. दरड कोसळल्याने आणि जमीन खचल्याने पाणी राड्यारोड्यासह बोगद्यामध्ये शिरले होते. त्यावेळी साधारणपणे २२ लोक बोगद्यामध्ये काम करत होते, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.के.जोशी यांनी दिली. रात्रभर बचाव मोहीम राबवून लोकांना वाचविण्यात यश आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

SCROLL FOR NEXT