राहू परिसराला गारांसह
वादळी वाऱ्याचा तडाखा
-----
फळबागा, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान
-----
राहू, जि. पुणे : दौंड तालुक्यातील राहू परिसराला बुधवारी (ता. १३) रात्री आठच्या सुमारास गारा आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले. त्यामुळे फळबागा, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच, अनेक घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर पडले आहेत.
वादळामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. राहू- वाघोली रस्त्यावरील समता नगर, सोनवणे मळा आणि पिलाणवाडी परिसरात झाडे पडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. साहेबराव डुबे, माजी सरपंच संपत डुबे, किसन डुबे आणि संदीप सोनवणे यांच्या घरांचे व गोठ्यांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले. सोनवणे डेअरी फार्मच्या गोठ्याचे पत्रे २०० फूट लांब उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे राहुल पुणेकर यांच्या डाळिंब बागेला मोठा फटका बसला असून, फळांचा सडा पडला आहे. सोनबा कोळपे यांचा भोपळा, अण्णा काळे यांची वांगी आणि योगेश कुल यांचा ऊस भुईसपाट झाला आहे. गणेश डुबे यांचा कांदाही पावसात भिजला आहे. परिसरात बुधवारी उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत
कोट -----
माझा दीड एक एकर दोडका पीक तोडणीला आले होते. दोडका पिकाला बाजारभावही चांगला होता. मात्र, वादळी पावसामुळे माझे साधारणतः तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
- सचिन मगर, शेतकरी, मगरवाडी
फोटो ओळी ----
राहू, ता. दौंड ः परिसरात झालेल्या गारांसह वादळी पावसामुळे दोडक्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.