44crime_logo_525_1.jpg
44crime_logo_525_1.jpg 
पुणे

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

अनिल सावळे

पुणे : पोलिसांनी खराडी-चंदननगर परिसरात कॉल सेंटरवर छापा टाकून गुजरातच्या चार जणांना अटक केली आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. या कॉल सेंटरमधून अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची फसवणूक करण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आज पहाटे प्राईड आयकॉन इमारतीमधील जार्विस टेक प्रा. लि. या कॉल सेंटरवर छापा टाकला. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी तिघेजण गुजरात अहमदाबाद आणि पाटण येथील रहिवासी आहेत. ते पुण्यात कॉल सेंटर चालवित
होते.

आरोपी हे अमेरिका आणि कॅनडातील नागरिकांना सोशल सिक्‍युरिटी अॅडमिनिस्ट्रेशनचे अधिकारी असल्याचे भासवत असत. त्यानंतर सोशल सिक्‍युरिटी नंबरचा गैरवापर करून परदेशी नागरिकांना आय ट्यून कार्ड, गिफ्ट कार्ड खरेदी करण्यास भाग पाडत होते. या कारवाईत कॉल सेंटरमधून हार्ड डिस्क, 14 लॅपटॉप, पाच एटीएम कार्ड, पाच मोबाईल आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT