Wine
Wine 
पुणे

दुसऱ्या दिवशीही पबवर छापे 

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहराच्या वेगवेगळ्या भागांतील पबवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी रविवारी छापे घातले. त्यामध्ये बेकायदा मद्यविक्री करत नियमभंग करणारे पबचे मालक, व्यवस्थापक व डीजेंवर कारवाई करण्यात  आली. यामध्ये पोलिसांनी लाखो रुपयांचे मद्य जप्त केले.

शहरातील मुंढवा, हडपसर परिसरात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या व मोठ्या आवाजात गाणी लावून शांततेचा भंग करणाऱ्या आठ पब व हॉटेल्सवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी पहाटे कारवाई केली. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले. याबाबतच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.

द हाउस ऑफ मेडीची, हॉटेल वेस्टीन, हॉटेल पेन्टहाउस, हॉटेल क्‍लब अलेरो, हॉटेल मेट्रो, हॉटेल अन्‌ वाइंड, हॉटेल हेफ एनएन लाउंज, हॉटेल क्‍यूबा लिबरे अशी कारवाई केलेल्या हॉटेल्स व पबची नावे आहेत. रविवारी पहाटे गुन्हे शाखेच्या पथकांनी चतुःशृंगी, येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पबवरही कारवाई केली. तेथेही बेकायदा मद्यविक्री होत असताना चार लाख रुपयांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : एचडी रेवण्णाला 14 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT