Railway reservation center closed till April 14 
पुणे

Lockdown : रेल्वेची आरक्षण केंद्रे 14 एप्रिलपर्यंत बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे : रेल्वेची आरक्षण केंद्रे 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानंतरच्या प्रवासासाठी आरक्षण खुले झाले असून प्रवाशांनी ते ऑनलाईन पद्धतीने करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
एक्‍स्प्रेस, इंटरसिटी, डेमू पॅसेंजर ट्रेन, लोकल आदी गाड्यांसाठी आरक्षण केंद्र 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यांची तिकिट विक्रीही त्या काळात बंद असेल. तसेच 14 एप्रिलनंतर प्रवासासाठी ज्यांना आरक्षण करायचे आहे, त्यांनी "आयआरसीटीसी'च्या संकेतस्थळावर जाऊन आरक्षण करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

सर्दी,खोकल्यापासून "फेस शिल्ड'द्वारे बचाव
 कोरोनामुळे ज्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, त्यांना पूर्ण परतावा मिळणार आहे. ऑनलाईन बुकींग ज्यांनी केले आहे, त्यांना त्याच खात्यात आर्थिक परतावा मिळेल. तसेच त्यांनी तिकिट खिडकीवरून आरक्षण केले आहे परंतु, त्यांना आता ते रद्द करायचे आहे, त्यांनाही 14 एप्रिलनंतर तिकिट खिडकीवरून परतावा मिळणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi Road Issue : ‘आयटी’चे नव्हे, हे समस्यांचे ‘हब’! हिंजवडीतील वाढत्या गैरसोयींवर ‘जेन-झी’ची टीका

Satara News : जिल्ह्यात येणार नवीन १२६ उद्योग; मर्सिडिस, फोक्सवॅगन, गोदरेजसारख्‍या उद्योगांची चर्चा; ४६ हजार कोटींची गुंतवणूक, १२ हजार नोकऱ्यांची संधी

आजचे राशिभविष्य - 18 ऑगस्ट 2026

Nagpanchami 2026: साप चावल्याने मृत्यू झाल्यास मिळणार ४ लाखांची मदत; जाणून घ्या नियम!

इनर इंजिनिअरिंग : व्यक्ती नव्हे, तर परिस्थितींची पारख

SCROLL FOR NEXT