Pune Rain  Rain
पुणे

पुण्यात पुढील 2 दिवस सरीवर सरी

पुणेकरांनो कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने रविवारी वर्तविली आहे. त्यामुळे पुणेकरांनो कामाव्यतिरिक्त घराच्या बाहेर पडू नका.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे पुण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बाष्प जमा झाले होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात शहरात पावसाच्या दमदार सरी पडल्या. त्या प्रभावातून पुण्याचे वातावरण पूर्ववत होत असताना आता पुन्हा पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

शहरात रविवारी सकाळपासून दुपारपर्यंत आकाश अंशतः ढगाळ होते. त्याचबरोबर उन्हाचा चटकाही जाणवत होता. कमाल तापमानाचा पारा ३५.३ अंश सेल्सिअस नोंदला गेला. दुपारनंतर वातावरणात वेगाने बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी झाली आणि संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहराच्या पेठांसह सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कोथरूड, कात्रज, सहकारनगर, धनकवडी येथे पावसाच्या हलक्या सरी पडल्या. दुपारपर्यंत वाढलेल्या उष्णतेमुळे स्थानिक परिणाम होऊन हा पाऊस पडल्याचे हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांमध्ये ढगांच्या गडगडटासह पाऊस पडेल, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. किमान तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदला जाईल.

मध्य महाराष्ट्रात तीन दिवस पाऊस

मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी पडतील. कोकणातही पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील, असे खात्याकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT