Rain Water in Yerwada Jail sakal
पुणे

Yerawada Jail Water : येरवडा जेलमध्ये शिरले पावसाचे पाणी!

पुण्यात कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे येरवडा जेलमध्येदेखील पाणी शिरले.

रूपाली अवचरे

विश्रांतवाडी - पुण्यात कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे येरवडा जेलमध्येदेखील पाणी शिरले. जेलच्या मुख्य प्रवेशद्वारासह आतील दरवाजे उघडून पाणी काढण्यात आले. तळमजल्यावरील कार्यालयात देखील पाणी शिरले होते. येरवडा जेलमध्ये पावसाचे पाणी शिरण्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी.

यामुळे कारागृह प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. पुणे शहरात सर्वंत्र पावसामुळे हाहाकार उडालेला असताना, येरवडा जेलच्या आतमध्येदेखील पाणी शिरल्यामुळे प्रशासनाच्या एकंदरीत कामकाजाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

पावसाचे पाणी जेलच्या आवारात शिरणे ही गंभीर बाब असून सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. या गंभीर समस्येवर प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी कारागृह प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Dussehra Melava 2025 Live Update: कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्याला सुरुवात

Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

परंपरा मोडायला घाबरत नाही... 'त्या' कारणामुळे दीपिका पदुकोण पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT