पुणे

काळेवाडीत पावसाळ्यापूर्वीची कामे संथगतीने

CD

अधिकारी कोट बाकी.

काळेवाडी, ता. ११ : काळेवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे, गटारे तुंबणे, खड्ड्यांमुळे अपघात होणे, झाडांच्या फांद्या कोसळणे इत्यादी समस्या निर्माण होत असतात. मात्र, यावर्षी महापालिका प्रशासनाकडून वेळेत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजनेसंदर्भात जलदगतीने पावले उचलली जात नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.
महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, नखातेनगर आदी भागांमध्ये अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला माती व बांधकामाचा राडारोडा पडून असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणीही अद्याप झालेली नाही.
जनगणना, त्यासाठी प्रशिक्षण व इतर कामांमध्ये कर्मचारी- अधिकारी व्यस्त असल्याचे कारणे दिली जात असल्याचे सांगून मूळ कामे मार्गी लागत नसल्याचे दिसून येत आहे. काळेवाडी ते कस्पटे वस्ती, वाकडकडे जाणाऱ्या मुख्य बीआरटीएस मार्गावर एम. एम. शाळेसमोर दरवर्षी जवळपास दोन ते दीड फूट पाणी रस्त्याच्या बाजूला साचून वाहतूक कोंडी होत असते. पण, महापालिका ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तापकीर मळा, नखाते वस्ती आदी ठिकाणी रस्त्यावर साठणारे पाण्याची डबकी होऊ नये, यासाठी महापालिका विभागाने आताच पावसाळ्यापूर्वी कामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरवर्षी विठ्ठल रुक्मिणीनगर येथील कमानीजवळ गटारे व पावसाळी वाहिन्यांमधून पाणी साचून पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पाणी तुंबल्याने वाहतूक विस्कळीत होते. मात्र, प्रशासन फक्त कागदोपत्री कामे दाखवत आहे.
- वैभव घोटकुले, व्यावसायिक

नालेसफाई आणि खड्डे बुजवण्याची कामे एप्रिल महिन्यात पूर्ण व्हायला हवी होती. घरासमोरील रस्त्यावर जवळपास गुडघ्यापर्यंत दरवर्षी पाणी साचून अपघात होतात. वाहतूक कोंडी होत असते. आता पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला तरी प्रशासन गंभीर दिसत नाही.
- हिराबाई तरडे, रहिवासी


काय आहेत समस्या ?
- नालेसफाईची कामे अपूर्ण
- रस्त्यांवरील खड्डे कायम
- पथदिव्यांची दुरुस्ती रखडली
- धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी नाही
- पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांकडे दुर्लक्ष
- पदपथ व गटारांवर अतिक्रमण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT