पुणे

दिल्लीत आजपासून ‘रायसिना डायलॉग’ परिषद

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता.४ ः भारताकडून आयोजित केल्या जाणाऱ्या भू-राजकीय तसेच भू-आर्थिक विषयावरीलर ‘रायसिना डायलॉग’ परिषदेला गुरुवारपासून (ता.५) दिल्लीत सुरुवात होत आहे. फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब हे यंदाच्या परिषदेचे प्रमुख पाहुणे आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्टब यांचे स्वागत केले.
मागील काही काळात जागतिक उलथापालथ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या ‘रायसिना डायलॉग’ परिषदेला महत्त्व आले आहे. भारत-फिनलंड यांच्यातील संबंध मित्रत्वाचे तसेच लोकशाही मूल्यांवर आधारित आहेत. स्टब यांच्या दौऱ्यामुळे हे संबंध आणखी मजबूत होतील, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. स्टब यांच्यासमवेत फिनलंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक पथक भारतात आले असून विविध क्षेत्रात दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या उपक्रमांचा या दौऱ्यात आढावा घेतला जाणार आहे. येत्या शनिवारपर्यंत (ता. सात) ‘रायसिना डायलॉग’ परिषद होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

मुंबईत २ लाख ट्रक चालक-मालक धडकणार, ई-चालान प्रणालीविरोधात उतरणार रस्त्यावर

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

Kamthi News : नागपूर हादरल! रंग उडवल्याच्या रागातून आजीने नातवावर ओतले उकळते पाणी

SCROLL FOR NEXT