rajdatta.jpg
rajdatta.jpg 
पुणे

मनाचिये वारी : आनंदाच्या आठवणींतून घ्या आत्मानंदाचा अनुभव

राजदत्त

Wari 2020 : वारी म्हणजे आनंद. स्वतःची सर्व काळजी त्या विठुरायावर सोपवून त्याच्या दर्शनाला जाताना जो आनंद मिळतो, तो अतिशय निरागस असतो. त्यातून मिळणारी ऊर्जा पुढचे वर्षभर पुरते. 1954 मध्ये मी पुण्यात पहिल्यांदा वारी पाहिली. तेव्हाच ठरवले की, आपणही वारीत थोडे का होईना चालायचेच. त्यानुसार 1955 पासून आजपर्यंत कामाच्या व्यग्रतेची पाच ते सात वर्ष सोडली, तर सुमारे पन्नास ते साठ वर्षे मी वारीत सहभागी झालो, मात्र पूर्ण वारी करू शकलो नाही. काही दिवस वारीसोबत जायचो. वेगवेगळ्या मित्रमंडळींसमवेत वारीचा आनंद घ्यायचो.

वारीत चालताना प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. तो नुसता चालत नसतो किंवा नुसते नामस्मरण करीत नसतो. विठ्ठलच आपल्या संगतीला आहे, हा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतो. तो आत्मानंदात चालत असतो. असा आनंद घेताना आपल्याला ऊर्जा मिळते, जगण्याची दिशा मिळते. ती मला वारीतून मिळत गेली. वारीच्या चित्रपटावर काम करताना मी आणि वसंतराव सबनीस एकत्र असायचो. त्या वेळी मी वारीत ज्याची कोणतीही सोय नाही, अशा वारकऱ्याप्रमाणे शेडमध्ये झोपलो. तो आनंद मला खूप महत्त्वाचा वाटला. पहाटे उठून पुन्हा कामाला लागलो. वारीत मदतीला येणारा दुसरा तिसरा कोणी नसतो, तो पांडुरंगच असतो, याची अनुभूती मला खूपदा आली.

कोरोनामुळे यंदा वारी रद्द झाली. त्यामुळे माझ्याही मनात आत्यंतिक दुःख आहे; पण मी यापूर्वी घेतलेल्या आनंदाच्या आठवणींतून ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो आहे. मी वारीत इतकी वर्षे आनंदाची लयलूट केली. यात आनंद मानून एक वर्ष नाही मिळाले, म्हणून वाईट वाटून न घेता मनाला समजावणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी या वर्षी वारीला जाऊ शकत नाही, म्हणून मला खंत नाही. ही पांडुरंगाची इच्छा असेल, असे समजून मी घरीच आत्मानंदाचा अनुभव घेत आहे.
(शब्दांकन : शंकर टेमघरे)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT