ग्रामीण पत्रकार संघाच्या
उपाध्यक्षपदी राजेंद्र दडस
पिंपळनेर ः टेंभुर्णी शहर ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी धनंजय भोसले तर उपाध्यक्षपदी ‘सकाळ’चे बातमीदार राजेंद्र दडस यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष प्राध्यापक हरिश्चंद्र गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. संघाचे संस्थापक संतोष वाघमारे व मुकुंद रामदासी यांनी सर्वानुमते निवड झाल्याचे जाहीर केले. निवड जाहीर होताच नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष अनुक्रमे श्री भोसले व श्री दडस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिद्धेश्वर शिंदे, सुहास कांबळे, विनायक जोशी, प्रदीप पाटील, सज्जन शिंदे, सोमनाथ निर्धर, सचिन जगताप, दीपक देशपांडे, गणेश स्वामी, आसिफ काझी उपस्थित होते.