वेल्हे, ता. २२ ः राजगड तालुक्यामध्ये भोंदू बाबा, साधू, तथाकथित देवऋषी, तांत्रिक आणि मांत्रिक यांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक व अंधश्रद्धा आर्थिक शोषण होण्याच्या घटना घडत आहेत. मात्र याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी येत नाहीत. नागरिकांनी अशा काही घटना घडल्यास पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी यावे, असे आवाहन वेल्हे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आजार किंवा व्याधी तसेच अपत्य प्राप्ती, भूतबाधा, करणी, जादूटोणा किंवा कौटुंबिक समस्या सोडवण्याच्या नावाखाली अनुचित विधी करणे महिला व मुलांना एकांतात बोलावून घेणे, प्राणी अथवा पक्ष्यांचा बळी देणे तसेच सोने -दागिने पैसे किंवा मालमत्ता दैवी शक्तीच्या नावाखाली ताब्यात घेणे अशा प्रकारची घटना घडत असल्यास संबंधित व्यक्तीशी वाद न घालता किंवा स्वतःहून कोणतीही कारवाई न करता वेल्हे पोलिस ठाण्यात येऊन माहिती द्यावी. तसेच राजगड तालुक्यातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत अधिकारी, मंदिर व्यवस्थापन व स्थानिक नागरिक यांनी आपल्या गावामध्ये असा कोणताही प्रकार चालू असल्यास पोलिस स्टेशनमध्ये कळवण्याचे आवाहन केले असून अशी कोणत्याही प्रकारची घटना राजगड तालुक्यामध्ये घडल्यास सदर व्यक्तीच्या विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम 2013 अन्वये कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.