पुणे

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शनिवारी राज्य वक्तृत्व स्पर्धा

CD

राजगुरुनगर, ता. २० : खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शनिवारी (ता. २२ ऑगस्ट) राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी ही माहिती दिली.
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंतीनिमित्त (प्रेरणा दिन) आयोजित या स्पर्धेचे हे ३५ वे वर्ष आहे. वरिष्ठ गटासाठी विचारसंस्कृतीसाठी वाचनसंस्कृती, एआय : धोका की संधी, दूरदर्शी नेतृत्व : अजितदादा पवार आणि पेपरफुटी व विद्यार्थी आंदोलने हे विषय आहेत. तर, कनिष्ठ गटासाठी पर्यावरण संवर्धन प्रत्येकाची जबाबदारी, युवकांचा आदर्श : स्वामी विवेकानंद, पेपरफुटी व विद्यार्थी आंदोलने आणि महिला अत्याचार : समाजासमोरील गंभीर आव्हान हे विषय निश्चित केले आहेत.
विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, हुतात्मा राजगुरू चषक व साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. शिरीष पिंगळे व संयोजन समितीने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धावत्या लोकलमध्ये आसनावरून वाद, नंतर धक्काबुक्की अन्... ६२ वर्षीय प्रवाशाला ढकललं; उपचारादरम्यान मृत्यू

J&K High Court Bench: लडाखमध्ये जम्मू-काश्मीर हायकोर्टची बेंच स्थापन होणार! केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा

CSMT Ghee Scandal: धक्कादायक! ‘मानवी सेवनासाठी नाही’ असे तूप मोटरमनच्या ताटात; सीएसएमटीतील ‘साई कटर्स’ कॅन्टीन बंद

Marwade Bypass : मरवडे बायपास मागणी आंदोलनात वाहतूक अडथळा; 35 ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, सनदशीर आंदोलनाला शिक्षा?

Latest Marathi News Live Update: बालवडकरांनंतर टिंगरेंचाही निधी घेतला काढून, स्थायी समितीत भाजपाच निर्णय

SCROLL FOR NEXT