BON26B01880
पानीव ः उपसरपंचपदी राजश्री शहाजी शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सरपंच लता कांबळे व ॲड. अभिषेक पाटील.
पानीवच्या उपसरपंचपदी राजश्री शिंदे
बोंडले ः पानीव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत राजश्री शहाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणूक २०२२ मध्ये प्रकाश पाटील प्रणित श्रीनाथ पानीव विकास आघाडीने सत्ता कायम राखली. मावळत्या उपसरपंच रोहिणी शिंदे यांनी ठरल्याप्रमाणे कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिल्याने उपसरपंचपद रिक्त झाले होते. या पदासाठी झालेल्या निवडणुकीत राजश्री शहाजी शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यासी अधिकारी तथा सरपंच लता मोहन कांबळे यांनी त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. स्वातंत्र्योत्तर काळापासून पानीव ग्रामपंचायतीवर श्रीनाथ पानीव विकास आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. निवडीनंतर सरपंच लता मोहन कांबळे व ॲड. अभिषेक पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच राजश्री शहाजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील व माजी सरपंच श्रीलेखा पाटील यांनी राजश्री शिंदे यांचे अभिनंदन केले. निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी ग्रामविकास अधिकारी व्ही. पी. नवले, कोतवाल मनीषा शिंदे यांनी सहकार्य केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मारकड, रोहिणी बाबर, रोहिणी बाबर पाटील, पूनम गुरव, प्रणित खवळे, कोमल खवळे, पमाबाई पवळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी खवळे, दिनेश बनकर, पोपट गुजर यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.