पुणे

'भाजपसाठी राम निवडणुकीपुरताच'

सकाळवृत्तसेवा

आपटाळे (जि. पुणे)  - हिंदू लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या राममंदिरावरून निवडणुकांमध्ये राजकारण केले जाते. असे राजकारण करणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे सांगितले. शिवजन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरी येथून अयोध्येला मंगलकलश नेण्यासाठी ठाकरे गुरुवारी किल्ले शिवनेरीवर आले होते.  

या प्रसंगी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, ‘‘दसरा मेळाव्यात राममंदिराबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली होती. राममंदिराच्या मुद्यावरून हिंदूंमध्ये गट तट निर्माण होऊ नयेत. वाजपेयी यांच्या काळात अनेक पक्षांचे मिळून सरकार होते, तर आता मजबूत सरकार असूनही राममंदिराचा प्रश्‍न प्रलंबितच राहिला आहे. अनेक निवडणुका झाल्या, मात्र राममंदिराचा प्रश्‍न सुटत नसल्याने अयोध्येत जाणार आहे.’’

उद्धव ठाकरे यांचे सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरने गडावर आगमन झाले. शिवजन्मस्थळ येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. तेथील मातीची विधिवत पूजा करण्यात आली. 

प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की राममंदिराचा मुद्दा घेतला जातो. खरंच हे राममंदिर कधी होणार आहे. किती निवडणुका होईपर्यंत तुम्ही (भाजप) ‘राममंदिर वही बनाऐंगे’ असे म्हणत लोकांना मूर्ख बनवणार आहात. याचेच उत्तर मला हवे आहे.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT