patanjali_ramdev baba 
पुणे

पतंजलीची एजन्सी मिळवून देण्याच्या नावाखाली सहा लाखाची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : व्यावसायिक असलेल्या भावांना बाबा रामदेव यांच्या प्रसिद्ध पतंजली या कंपनीची एजन्सी मिळवून देण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तिनी पावणे सहा लाखाची फसवणूक केल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तिविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी बाणेर येथे राहणाऱ्या 46 वर्षीय व्यक्तिने फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी मोबाईलधारक, पंजाब व आसाम येथील बैंक खातेधारक अशा तिघाविरुद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यावसायिक आहेत. त्यांना व त्यांच्या कर्नाटकमधील विजापुर येथे राहणाऱ्या भावाला नवीन व्यावसाय सुरु करायचा होता. त्यावेळी त्यांना एका अनोळखी व्यक्तिने मोबाईलद्वारे संपर्क केला.

"मी पतंजलीचा मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे, तुम्हाला पतंजलीची एजन्सी सुरु करायची असेल तर तुम्हाला 20 हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक लाख रुपये आगाउ रक्कम भरावी लागेल" असे सांगितले. त्यावर फिर्यादीनेही विश्वास ठेवला. त्यानंतर आरोपीनी त्यांना पंजाब व आसाम येथील बैंक खाते क्रमांक पाठवून दिले. त्यानुसार फिर्यादीने वेळोवेळी 5 लाख 70 हजार रुपयाची रक्कम संबंधित खात्यावर भरली. त्यानंतर त्यांनी सतत त्यांच्यकडे एजन्सीसाथी पाठपुरावा केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकड़े फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पप्पू यादवांचा पुजाऱ्याचा वेष अन् राहुल गांधींची श्रद्धाळूची भूमिका; संसदेतील 'त्या' प्रकारावर लोकसभा अध्यक्ष नाराज

IND vs SL Test : जसप्रीत बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार? प्रमुख गोलंदाजाचा फिटनेस अहवाल आला समोर; नेमकं काय आहे त्यात?

Pune Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना चाप! पुणे पोलिसांच्या डिजिटल कारवाईत 845 पोस्ट हटवल्या, 132 गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : डेंगळे पुलाखाली चेंबरवर अडकलेल्या युवकाची दलाच्या जवानांकडून सुटका

Thane News: ठाण्यात नवं प्राणिसंग्रहालय उभारणार, १० कोटी रुपयांची तरतूद, राज्य सरकारचा निर्णय; कसा असेल प्रकल्प?

SCROLL FOR NEXT