Ramjan Eid Crowd
Ramjan Eid Crowd sakal
पुणे

Ramadan Eid : ईद निमित्त खरेदीसाठी शिवाजी मार्केट येथे नागरिकांची गर्दी

मोहिनी मोहिते

मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दि, 20 एप्रिल रोजी शिवाजी मार्केटच्या बाजारपेठेत खरेदीसाठी महिला व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

कॅन्टोन्मेंट - मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजे रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दि, 20 एप्रिल रोजी शिवाजी मार्केटच्या बाजारपेठेत खरेदीसाठी महिला व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भर दुपारी रखरखत्या उन्हात तर सायंकाळी पावसाच्या वातावरणात ही महिला मोठ्या प्रमाणात खरेदी करिता घराबाहेर पडताना दिसल्या.

कोरोनाच्या काळात खरेदीला सूट मिळाली होती, मात्र सण उत्साहात असा साजरा करता आला नाही. यंदा, मात्र सणाकरिता नागरिकांची खरेदीची लगबग पाहता ईद अतिशय उत्साहात साजरी होणार असल्याचे चित्र पूर्व भागात दर्शनिय होते.

शेवई, सुकामेवा , कापड दुकानांसह, बांगड्या चप्पल, मेहंदी कोन, फळे, शोभेच्या वस्तू, घर स्वच्छ व सुशोभित करण्याचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड होती.

ईद म्हटलं की गोड धोड पदार्थ म्हणजे शीरखुर्मा. आणि हा शीरखुर्मा तयार करण्यासाठी बाजारात सध्या विविध प्रकारच्या रंगीत शेवई उपलब्ध केल्या आहे. यामध्ये क्वालिटी, बनारस, मालेगाव, गणेश अशा अनेक प्रकारच्या शेवया आहेत. कीमामी शेवई ही हलवा बनवण्यासाठी उपयोगात आणली जाते. सुमारे 240 रुपये किलो प्रमाणे या शेवया विक्री साठी आहे, त्याचबरोबर खजूर, काजू, बदाम, मनुका, मगज बीज, विलायची, अंजीर याबरोबर फालुदा, रुअब्जा शरबत, कस्टर्ड पावडर, खोबरा, खसखस, तूप आदींची मागणी सध्या जोरात आहे. 1000रू किलो प्रमाणे ड्रायफूट तर सर्वात महाग म्हणजे 2600 रुपये प्रति किलो पिस्ताचा दर असल्याची माहिती जुल्फिन ड्रायफूट्सचे दिलावर खान यांनी दिली.

यावेळी मुस्लिम समाजात पुरुषांनी टोपी घालने सुन्नत समजली जाते. टोपी शिवाय त्यांचा पेहराव अपुरा असतो. नमाज पठण करण्यासाठी, तसेच ईद निमित्त बाजारात आकर्षक रंगबिरंगी टोप्या बाजारात खरेदी करिता उपलब्ध आहे. विशेषता पांढऱ्या रंगाच्या टोपीला अधिक मागणी असते. याचबरोबर इत्तर, सुरमा अरबी, रुमाल, साफा, शॉल, तसबी कुरान शरीफ, काबा मदिना चे शोपीस याची मागणी ही वाढत असल्याचे दुकानदार सैफुद्दीन बर्मुय्या यांनी सांगितले.

महिलांकरिता मेकअप साहित्य, नेकलेस, मेहंदी कोन, बुरखा, हिजाब, चमकदार, भरजरीत साड्या, पंजाबी ड्रेस, वणपीस, घागरा, पर्स, चादरी, रजई, सोफा कव्हर, पडदे, टेबल क्लॉथ अशा विविध साहित्यांनी दुकाने व रस्त्यावरील स्टॉल सजले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT