Ramoshi Community still is on Backward says Shitole 
पुणे

रामोशी समाज आजही मागासलेला : शितोळे

दीपक मदने

सांगवी : रामोशी समाज आजही मागासलेला असून रामोशी बांधवांना आर्थिक बाजूने मजबूत करण्यास राज्यशासन लवकरच उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून देणार असून याबाबत राज्य शासन अग्रणी असल्याचे मत जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी व्यक्त केले. 

आद्य क्रांतीवीर राजेउमाजी नाईक यांच्या जयंती कार्यक्रमात सोमंथळी ता.फलटण येथे सामाजिक पुरस्कार वितरण सोहळ्यात शितोळे बोलत होते. उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे ज्येष्ठ नेते बबनराव खोमणे, खजिनदार संजय जाधव,सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले, बाळासाहेब मदने, अरविंद जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भारत जाधव, पुणे जिल्हा अध्यक्ष नानासो मदने, लालासाहेब मसुगडे, लखन आडके, प्रकाश खोमणे, अॅड राहुल मदने, धनाजी जाधव, सुनील जाधवसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रास्ताविकात रामोशी समाजाच्या समस्या आणि आजच्या स्थितीबाबत बबनराव खोमणे, संजय जाधव, सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबलेसह अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. 

शितोळे म्हणाले, रामोशी समाज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असून रामोशी समाजाला सरकारी योजनांपासून वंचित ठेवण्यात आले होते. उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंतीस ६० वर्षे वाट पाहावी लागली. सरकारने तातडीने शासकीय परिपत्रक काढून उमाजी नाईक यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी केली. फडणवीस सरकारने उमाजी नाईकांना दरोडेखोरांच्या यादीतून बाहेर काढून थोर पुरूष साधू संतांच्या यादीत समाविष्ट केले. रामोशी समाजाला आर्थिक भक्कम करण्यासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार आहेत.

धनदांडग्यांनी दहशतीच्या जोरावर कब्जा केलेल्या इनामी जमीनी परत मिळवून देणार असल्याचा शब्द मुख्यमंत्री-देवेंद्र फडणवीस यांनी भिवडी (पुणे) येथील आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात दिला आहे. यामुळे आम्ही फडणवीस सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे दौलतनाना शितोळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

राहुल भंडलकर, मधुकर जाधव, मधुकर भंडलकर, संतोष बोडरे,हणमंत खोमणे, विनोद चव्हाण,लालासाहेब मदने, हेमंत भंडलकर, बाळासो यादव,गणेश बोडरे, चव्हाण, जाधव,मदने यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले तर आभार सोमनाथ मसुगडे यांनी मानले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१२ कोटींची रोकड, ६ कोटींचे दागिने अन्...; काँग्रेस आमदाराकडे आढळलं घबाड, जप्त केलेल्या मुद्देमालाचा आकडा वाचून व्हाल थक्क

"माझ्या मुलाला वाचवा मी..." मुलाच्या जन्मावेळेस ढसाढसा रडू लागला गोविंदा; "गर्भलिंग निदान चाचणी.."

AC कोचच्या बाथरुममध्ये आढळला पाच वर्षांच्या मुलीचा मृतदेह....मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमध्ये खळबळ

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Latest Marathi News Updates : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्वच्छ सन्मान सोहळ्याला, उप मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित

SCROLL FOR NEXT