Grey Babbler Bird sakal
पुणे

Grey Babbler Bird : चिमुकल्यांनी ग्रे बाबलेर पक्षाची मांज्या विळख्यातून केली सुटका

मानेभोवती व दोन्ही पायात अडकलेल्या मांज्याच्या विळख्यातून निपचित पडलेल्या ग्रे बाबलेर पक्षाची अखेर पाच चिमुकल्यानी केली सुटका.

सुषमा पाटील.

मानेभोवती व दोन्ही पायात अडकलेल्या मांज्याच्या विळख्यातून निपचित पडलेल्या ग्रे बाबलेर पक्षाची अखेर पाच चिमुकल्यानी केली सुटका.

रामवाडी - मानेभोवती व दोन्ही पायात अडकलेल्या मांज्याच्या विळख्यातून निपचित पडलेल्या ग्रे बाबलेर पक्षाची अखेर पाच चिमुकल्यानी केली सुटका.

वेळ सकाळी सात वाजता, कामगार वस्तीत मुले खेळत असताना झाडीत काही तरी हालचाल होत आहे, हे पाहण्यासाठी मुले गेली असता ग्रे बाबलेर पक्षी नायलॉन मांज्याच्या विळख्यात अडकलेला दिसला. मुले जवळ गेली तर घाबरुन गेला. मोठय़ा आवाजात ओरडू लागला, अशा वेळी रस्त्याने जाणारे स्थानिक रहिवासी संजय सोमवंशी यांना आवाज दिला. त्यांच्या मदतीचा आधार घेतला. मुलांनी घरातून कात्री आणि वाटीत पाणी आणले.

अलगद उचलून त्या पक्ष्याच्या मानेचा व दोन्ही पायाचा मांजा कात्रीने कापला, पाणी पाजले, त्यानंतर त्या पक्षाला उडण्यासाठी झाडीजवळ सोडून देण्यात आले. सात ते आठ वर्षाच्या आतील कृष्णा राठोड, वैष्णवी राठोड ,सोनाली राठोड, पूजा राठोड या लहान मुलांनी ग्रे बाबलेर पक्ष्याला जीवदान दिले.

चिनी व नायलॉन मांज्यावर बंदी घातलेली असताना शहरासह उपनगर भागात सर्रासपणे विक्री सुरू आहे. मानव व पक्षी यांच्या जीवावर बेतणारे अनेक घटना घडल्या. तरीही विक्री व त्याचा वापर करणार्‍यावर पोलिस व महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचे दिसुन आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT