Rape
Rape Sakal
पुणे

पुणे स्टेशन स्वच्छतागृहात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा

स्वच्छतागृहामध्ये गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बलात्कार झाल्याची घटना घडली.

पुणे - स्वच्छतागृहामध्ये (Toilet) गेलेल्या एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बलात्कार (Rape) झाल्याची घटना घडली. हि घटना पुणे स्टेशनच्या (Pune Station) परिसरात घडली. तर आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी देत हडपसर येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. दोन्ही घटनांप्रकरणी बंडगार्डन व हडपसर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक शोषण (पॉक्‍सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे स्टेशन येथे घडलेल्या घटनेप्रकरणी 36 वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन 35 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन येथील रेल्वे हॉस्पिटलजवळ जनसेवा शौचालय आहे. तेथे फिर्यादी यांची 12 वर्षांची मुलगी शुक्रवारी पहाटे दिड वाजता गेली होती. त्यावेळी महिलांच्या स्वच्छतागृहामध्ये आगोदरच एक व्यक्ती लपून बसला होता. मुलगी आत गेल्यानंतर त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. मुलगी बाहेर आल्यानंतर तिने हा प्रकार तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत.

दरम्यान, हडपसर येथे घडलेल्या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुरज बबन कांबळे (वय 22, रा. चंदगड, जि. कोल्हापूर) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची अल्पवयीन मुलगी व कांबळे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. कांबळे याने जानेवारी महिन्यात त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी मगरपट्टा परिसरातील एका लॉजवर बोलाविले. मुलगी तेथे गेल्यानंतर त्याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यावेळी मुलीने त्यास विरोध केला. तेव्हा, त्याने "मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. नाही तर मी आत्महत्या करेन ' अशी धमकी देऊन मुलीवर बलात्कार केला. हा प्रकार मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT