वेनवडी (ता. भोर) - डोंगरात आढळलेला दुर्मीळ ‘ॲटलस मॉथ’ पतंग.
वेनवडी (ता. भोर) - डोंगरात आढळलेला दुर्मीळ ‘ॲटलस मॉथ’ पतंग. 
पुणे

भाेरमध्ये आढळला दुर्मीळ ‘ॲटलस मॉथ’

सकाळवृत्तसेवा

भोर - वेनवडी (ता. भोर) डोंगरावर दुर्मीळ ‘ॲटलस मॉथ’ नावाचा पतंग (फुलपाखरू) आढळून आले. भोरमधील शिक्षक आनंता कदम व केशव पवळे यांच्या दृष्टीस हा पतंग पडला. सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर फूटभर लांब पंख असलेले मोठे फुलपाखरू दगडावर बसलेले त्यांना दिसले. त्यांनी कुतुहलाने त्याचे फोटोही काढले. परंतु काही वेळाने ते फुलपाखरू एका छोट्या पक्षाप्रमाणे उडून गेले. हे फुलपाखरू नक्की काय होते याची जाणीव त्यांना झाली नाही. त्यामुळे त्यांनी पिसावरे येथील पक्षिनिरीक्षण मंडळाचे प्रमुख संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हे फुलपाखरू नसून ‘ॲटलस मॉथ’ नावाचा पतंग असल्याचे सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याविषयी अधिक माहिती देताना श्री. दळवी यांनी सांगितले की, हा महिना देशात बटरफ्लाय मंथ म्हणून ओळखला जातो. या महिन्यात सर्वाधिक फुलपाखरे व  पतंगाचे दर्शन होते. अनेक लोक पतंग (मॉथ) आणि फुलपाखरे (बटर फ्लाय) यात गोंधळून जातात. पंरतु पतंग संध्याकाळी कृतिशील असतात, तर फुलपाखरे सकाळपासून संध्याकाळ पर्यंत कृतिशील राहतात. पतंग पंख मिटवत नाहीत तर पसरून बसतात. याऊलट फुलपाखरू सतत पंखांची हालचाल करत असते.

या पतंगाविषयी...

  • आशिया खंडातील जंगलात आढळणारी ही स्थानिक प्रजाती
  • १७५८ मध्ये कार्ल लिनीअसने केली प्रजातीची नोंद 
  • ‘व्हाइट वीच’ आणि ‘अटॅकस सिजर’ या दोन प्रजातीच ॲटलस मॉथपेक्षा मोठ्या.
  • मॉथचा पंखांचा विस्तार (दोन पंखांतील अंतर) जास्तीत जास्त २४ सेंमी
  • मादी ही नरापेक्षा मोठी, नराच्या मिशा रुंद असतात. 
  • शरीर पंखांच्या तुलनेत खूप लहान.
  • ‘ॲटलस मॉथ’चे आयुष्य साधारण १ ते २ आठवडे.

‘ॲटलस मॉथ’ची वैशिष्ट्ये

  • मादी शरीरातून एक प्रकारचा रासायनिक द्रव सोडते. 
  • याचा वास नरास कित्येक किलोमीटर दूर येतो. 
  • नर आणि मादीचे मिलन झाल्यावर अंडी देऊन मादी मरण पावते. 
  • अंड्यातून मातकट हिरवट रंगाचे सुरवंट बाहेर येतात. 
  • साधारण ४ सेंटिमीटरपर्यंत सुरवंटाची वाढ होते.
  • लिंबू, संत्रे, पेरूच्या पानांवर, वनस्पतीवर यांची वाढ होते.  
  • चार आठवडे कोषाच्या अवस्थेत काढल्यावर सुरवंटाचे मॉथमध्ये रूपांतर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT