पुणे

बुद्धेहाळ तलावावर ब्लू-चीक्ड बी-ईटरचे थव्यांचे दर्शन

CD

SGW26B10177, SGW26B10178
सांगोला : तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव व परिसरात प्रथमच दर्शन झालेला दुर्मिळ प्रवासी पक्षी ब्ल्यू-चीक्ड बी-ईटर.
---
बुद्धेहाळ तलावावर निळ्या गालाचा वेडा राघू!
सांगोला तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने नोंद; पक्षीप्रेमी, छायाचित्रकारांमध्ये उत्साह
दत्तात्रय खंडागळे : सकाळ वृत्तसेवा
सांगोला, ता. २१ : तालुक्यातील बुद्धेहाळ तलाव व परिसरात दुर्मिळ प्रवासी पक्षी असलेल्या ब्ल्यू-चीक्ड बी-ईटर (Merops persicus) अर्थात ‘निळ्या गालाचा वेडा राघू’चे ५० हून अधिक पक्षी आढळून आले. सांगोला तालुक्यात या पक्ष्यांची एवढ्या मोठ्या संख्येने झालेली ही प्रथम नोंद असल्याने पक्षीप्रेमी व पक्षी छायाचित्रकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बुद्धेहाळ तलाव परिसर विविध पक्षी व वन्यजीवांसाठी अनुकूल अधिवास म्हणून ओळखला जातो. यंदा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असले, तरी बुद्धेहाळ तलावाची पाणीपातळी तुलनेने चांगली आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे तलावातील पाणीसाठा टिकून राहिल्याने पक्ष्यांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
बुद्धेहाळ तलावाचे बांधकाम ब्रिटिश काळात १९०२ मध्ये करण्यात आले असून, उर्वरित कामे १९५७ मध्ये पूर्ण झाली. सांगोला व आटपाडी तालुक्यांना पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने हा तलाव उभारण्यात आला. पाणलोट क्षेत्र, उंच झाडे, तटबंदी आणि ब्रिटिशकालीन वास्तूंमुळे हा परिसर पक्षी निरीक्षणासाठी महत्त्वाचा ठरतो.
ब्ल्यू-चीक्ड बी-ईटरचा रंग चमकदार हिरवा असून, गालांवरील ठळक निळा पट्टा, डोळ्यांवरील काळी पट्टी आणि लांब टोकदार शेपटी ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. मधमाशा, गांधीलमाशा, चतुर यांसारख्या उडणाऱ्या कीटकांवर तो उपजीविका करतो. नदी, तलाव किंवा पाणथळ परिसरातील मोकळ्या वाळूमध्ये बोगद्यासारखी घरटी तयार करण्याची त्याची प्रवृत्ती आहे.
पश्चिम व मध्य आशियातील प्रजनन क्षेत्रांतून हे पक्षी स्थलांतर करून भारतात येतात. गुजरात, राजस्थान तसेच महाराष्ट्रातील काही पाणथळ व मोकळ्या परिसरात त्यांची नोंद झाली आहे. सप्टेंबरपासून त्यांचे हिवाळी पाहुणे म्हणून आगमन होत असल्याचे पक्षी निरीक्षक सांगतात.
---
प्रथमच मोठ्या संख्येने नोंद
सांगोला येथील पक्षी अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे बुद्धेहाळ तलाव परिसरात पक्षी निरीक्षणासाठी गेले असता त्यांना ब्ल्यू-चीक्ड बी-ईटरचा ५० हून अधिक पक्ष्यांचा मोठा थवा आढळला. या निरीक्षणाची नोंद आंतरराष्ट्रीय ‘ई-बर्ड’ व्यासपीठावर करण्यात आली आहे.
---
कोट
SGW26B10176
बुद्धेहाळ तलाव परिसरात ब्ल्यू-चीक्ड बी-ईटरचे ५० हून अधिक पक्षी मोठ्या थव्याने आढळून आले. सांगोला तालुक्यात या पक्ष्यांची एवढ्या मोठ्या संख्येने झालेली ही प्रथमच नोंद आहे. तालुक्यातील विविध तलाव व पाणथळ परिसर स्थलांतरित आणि हिवाळी पाहुण्या पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवास ठरत आहेत. या नोंदीमुळे सांगोला तालुक्याचे पक्षीवैविध्य अधोरेखित झाले आहे.
- प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे, सांगोला महाविद्यालय व पक्षीप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT