पुणे

पुणे : सिंहगड रस्त्याने जायचंय? करावा लागेल अडचणींचा सामना

निलेश बोरुडे

किरकटवाडी : दोन वर्षांपासून रखडलेले सिंहगड रस्त्याचे काम, अर्धवट सोडलेले खडकवासला बाह्यवळण रस्त्याचे काम व रस्त्याची झालेली दुरावस्था याविरोधात खडकवासला ग्रामस्थ उद्या (शनिवार) रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. 

सकाळी दहा वाजल्यापासून मुख्य सिंहगड रस्त्यावर खडकवासला येथील बालाजी वॉशिंग सेंटरसमोर 'रास्ता रोको' आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग व हवेली पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय रास्ता रोको आंदोलन स्थगित केले जाणार नाही. रुग्णवाहिका वगळता एकही वाहन रस्त्यावरून जाऊ दिले जाणार नाही, अशी तीव्र भूमिका खडकवासला येथील नागरिकांनी जाहीर केली आहे.

डोणजे येथे 'हवेली तालुका अजिंक्य' कुस्ती स्पर्धेचे आयोजन शनिवारी करण्यात आहे. त्यामध्ये रास्ता रोको न करण्याचे आवाहन हवेली पोलिस स्टेशनच्या वतीने खडकवासला ग्रामस्थांना करण्यात आले आहे; मात्र ग्रामस्थ आंदोलनावर ठाम असल्याचे कळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : "रोज 300 रुपये हप्ता घेऊनही माझ्या दुकानावर कारवाई का केली?" डोंबिवलीत मराठी तरुणीचा टाहो; भावुक करणारा व्हिडिओ व्हायरल

Fire Breaks Out at Mahape MIDC : नवी मुंबईतील महापे MIDC मध्ये अग्नितांडव, केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Mumbai News: मुंबईकरांनो सावध व्हा! उघड्यावर लघवी, थुंकणे महागात पडणार; बीएमसीने दंड वाढवला, आता किती आकारणार? वाचा...

KDMC Election: शेवटचे मोबाईल संभाषण कोणासोबत? शिवसेना ठाकरे गटाचे २ नगरसेवक हरवले, पोलिस स्टेशनमध्ये निवेदन

Latest Marathi news Live Update: नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील कंपनीला आग

SCROLL FOR NEXT