पुणे

'या' कारणामुळे पिंपरी-चिंचवडमधील रेशन दुकानदार हवालदिल

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पंतप्रधान गरीब कल्याण धान्य योजनेअंतर्गत तसेच, प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे आणि जून महिन्यापर्यंत धान्य वाटप झाले. मात्र, त्याचे कमिशन मिळाले नसल्याने रास्त भाव धान्य दुकानदार हवालदिल झाले आहेत. 

शहर परिसरात पिंपरी (ज), चिंचवड (अ) आणि भोसरी (फ) असे तीन परिमंडल कार्यालय असून, त्याअंतर्गत सुमारे 300 रास्त भाव धान्य दुकाने कार्यरत आहेत. 'अ' विभागात 124, 'ज' विभागात 79 तर 'फ' विभागात 130 दुकाने आहेत. मात्र, त्यांना अद्याप या योजनांचे धान्य वाटपाचे कमिशन मिळाले नाही. ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकिपर असोसिएशनचे प्रदेश खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, की केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत विना रेशनकार्डधारक व्यक्तींना मोफत 5 किलो तांदूळ, 1 किलो चणा, असे धान्य वाटप करण्यात आले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना देखील 5 किलो मोफत तांदूळ आणि 1 किलो डाळ वितरीत करण्यात आली. त्याचे वाटप जूनपर्यंत चालले. या धान्यासाठी प्रति 100 किलोमागे 150 रुपयांचे कमिशन मिळते. मात्र, धान्य वाटपाच्या कमिशनचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. नियमित लाभार्थ्यांच्या धान्य वाटपाचे कमिशन धान्याच्या रकमेतूनच वळते करुन घेतले जाते. केशरी कार्डधारकांचेही धान्य वाटपाचे कमिशनची अडचण नाही. परंतु, गरीब कल्याण धान्य योजना आणि प्राधान्य कुटूंब योजनेतील धान्य वाटपाचे कमिशन लवकरात लवकर दिले जावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

Latest Marathi News Live Update : जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन

Satara Lok Sabha : 'साताऱ्याचा खासदार शशिकांत शिंदेच होणार, ही काळ्या दगडावरची रेघ'; जयंत पाटलांना विश्वास

Laptop Overheating : उन्हाळ्यात लॅपटॉप होतोय अधिक गरम? ब्लास्ट होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

Salman Khan: "टाइगर जिंदा है और..."; घरावरील गोळीबार प्रकरणानंतर भाईजान पोहोचला लंडनला, यूकेच्या खासदारांकडून फोटो शेअर

SCROLL FOR NEXT