पुणे

रावेतमध्ये आरोग्यविषयक तक्रारींत वाढ

CD

रावेत, ता.२२ : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलाचा फटका रावेत परिसरातील नागरिकांना बसत आहे. सकाळी थंडावा, दुपारी तीव्र उष्णता तर संध्याकाळी पुन्हा गारवा, अशा चढउतारांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ, अंगदुखी तसेच अ‍ॅलर्जीच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

रावेतमधील खासगी वैद्यकीय क्लिनिक आणि महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून दमा किंवा अ‍ॅलर्जी असलेले रुग्ण अधिक त्रस्त असल्याचे डॉक्टर सांगतात. वातावरणातील बदलासोबतच वाढलेली धूळ आणि प्रदूषण यामुळेही आरोग्याच्या समस्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. तर, ‘‘
सकाळी थंडी, दुपारी प्रचंड उकाडा आणि संध्याकाळी पुन्हा गार हवा यामुळे शरीर जुळवून घेऊ शकत नाही. घरात लहान मुले आहेत. त्यांना सतत सर्दी-खोकला होत आहे,’’ असे रावेत परिसरातील रहिवासी अमोल देशमुख यांनी सांगितले.


रावेत परिसरात बांधकामांमुळे धूळ खूप वाढली आहे. हवामान बदलासोबत ही धूळ श्वासातून आत जाते आणि डोळ्यांना, घशाला त्रास होतो. मास्क वापरूनही पुरेसा आराम मिळत नाही.
- प्रिया पाटील, नागरिक

हवामानातील चढउतारामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’ चे प्रमाण वाढते. सध्या सर्दी, खोकला, घसा दुखणे, ताप आणि अ‍ॅलर्जीचे रुग्ण मोठ्या संख्येने येत आहेत. नागरिकांनी पाणी भरपूर प्यावे. थंड-गरम पदार्थ टाळावेत आणि अंग झाकून ठेवावे.
- डॉ. बाळासाहेब होडघर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कुटे रुग्णालय, आकुर्डी

लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यावर वातावरण बदलाचा परिणाम लवकर होतो. ताप किंवा खोकला जास्त दिवस राहिल्यास स्वतः औषधे देण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- डॉ.अश्विनी पाटील, बालरोगतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: शिर्डीच्या प्राईम भूखंडावर घाईघाईने गव्हाची कापणी! कॅप्टन खरातच्या अफाट संपत्तीचे धक्कादायक रहस्य उघड... कुठे किती संपत्ती?

Nashik Temple Theft : देवही सुरक्षित नाहीत! सातपूरमधील ३ मंदिरांच्या दानपेट्या फोडणारा चोरटा गजाआड

PNG Gas Connection : गॅस सिलिंडरचं टेन्शन मिटलं ! आता २४ तासांत मिळेल PNG कनेक्शन, घरबसल्या 'असा' करा अर्ज

RCB चा माजी खेळाडू झाला पुन्हा बाबा; दोन जुळ्या मुलानंतर घरी आली परी

Hindu Nav Varsh: असा मराठी राजा, ज्याचा विजय साजरा करण्यासाठी गुढी उभारण्याच्या प्रथेला झाली सुरुवात; जाणून घ्या इतिहास

SCROLL FOR NEXT