पुणे

रेबिज इंजेक्‍शनप्रकरणी चौकशी 

सकाळवृत्तसेवा

पुणे -  शिवाजी रस्त्यावरील गाडीखान्यामध्ये (डॉ. कोटणीस रुग्णालय) रेबिजच्या इंजेक्‍शनसाठी रुग्णाची ससेहोलपट करणाऱ्या डॉक्‍टर आणि परिचारिकांच्या चौकशीचा फतवा महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी काढण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांकडून या प्रकरणाचा लेखी खुलासा मागविण्यात आला आहे.

कुत्रे चावल्यामुळे रेबिज इंजेक्‍शन घेण्यासाठी अनिता पवार सोमवारी गाडीखाना रुग्णालयात गेल्या होत्या. दुपारी बारा ते सव्वाबारा वाजता पोचलेल्या पवार यांना कुत्रे चावल्याच्या वेदना असतानाच येथील परिचारिका आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कुत्रे नेमके कुठे चावले आहे, त्याची वर्गवारी कोणती, अशी प्राथमिक माहिती न घेता आलेल्या रुग्णाला रुग्णालयातून पिटाळून लावण्याचे सर्व प्रयत्न केले. त्यात केस पेपर काढायची वेळ संपली, जेवणाची वेळ झाली, इंजेक्‍शन संपले इथपासून ते अगदी इंजेक्‍शनचा कोटा संपला  आहे इथपर्यंत सगळ्या कारणांची यादी येथील वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांनी वाचली. या पार्श्‍वभूमीवर पवार यांनी ‘सकाळ’मध्ये संपर्क साधला. ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने पाठपुरावा केला. महापालिका आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी पवार यांना तातडीने इंजेक्‍शन देण्याचा आदेश संबंधितांना दिला. या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने नोंद घेऊन महापालिकेने गाडीखान्यातील संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिकांची चौकशी सुरू केली आहे. 

महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. अंजली साबणे म्हणाल्या, ‘‘या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका यांच्याकडून लेखी खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’’

संबंधित वृत्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT