Vikram Kumar
Vikram Kumar Sakal
पुणे

पुणे महापालिकेत पुढील महिन्यात नोकर भरती - विक्रम कुमार

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी पुढील महिन्यात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

पुणे - पुणे महापालिकेतील (Pune Municipal) रिक्त पदे (Empty Post) भरण्यासाठी पुढील महिन्यात भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबविली जाणार आहे. त्यासाठी अतिरीक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी सोमवारी दिली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी प्रशासक तथा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ते म्हणाले, ‘‘महापालिकेत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यासाठी बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती प्रत्येक विभागतील रीक्त पदांची माहिती एकत्रित करेल. त्यानंतर प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, ती कोणती पदे आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रीया परीक्षा पद्धतीनेच केली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेला नियुक्त करायचे का, त्यासाठीची प्रश्‍नपत्रिका कोणी तयार कराययाची, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुढील महिन्यात भरतीची प्रक्रिया राबविऱ्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

पीएमपीकडे सध्या काही पदे जास्त आहे. यामध्ये काही चालक आणि लिपिक यांचा समावेश आहे. कायम पदावरील सेवकांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भातही विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले.

सभेत घेण्यात आलेले निर्णय

  • पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पेारेशन लिमिटेडला महापालिकेच्या वाट्याची सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देणार

  • खासगी रूग्णालय आणि शुश्रुषागृहांच्या परवाना आणि नुतनीकरणाच्या शुल्कात वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी

  • औध येथे उभारण्यात येणाऱ्या पशुधन रुग्णालयासाठी तीन कोटी रुपयांच्या वर्गीकरणास मान्यता

  • नगररोड व वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाडणकामासाठी कंत्राटी कामगार पुरविण्याच्या सुमारे ४ कोटी ९१ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT