red-rose 
पुणे

‘व्हॅलेंटाइन डे’मुळे गुलाब बहरला

प्रवीण डोके

मार्केट यार्ड -  ‘व्हॅलेंटाइन डे’च्या पार्श्‍वभूमीवर मार्केट यार्डातील फूल बाजारात विविध प्रकारच्या गुलाबांना मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४० टक्‍क्‍यांनी भावात वाढ झाली आहे. 

रविवारी घाऊक फूल बाजारात दर्जानुसार गुलाबाच्या २० नगास १६० ते १८० रुपये भाव मिळत असल्याची माहिती अखिल फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली. किरकोळ बाजारात एक फूल २० रुपयांना मिळत आहे. पुढील दोन दिवसांत अजून भाव वाढतील, असे त्यांनी सांगितले.

मावळ आणि शिरूर तालुक्‍यातून बाजारात गुलाबांची आवक होत आहे. तसेच नागपूर, सुरत, बडोदा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली येथे फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ ला आणखी चार दिवस आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला आहे. पुढील दोन दिवसांत आणखी आवक वाढेल, असे वीर यांनी सांगितले. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे इमेज तसेच व्हिडिओद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेण्ड वाढत आहे. सध्या बाजारात मागणी कमी असल्यामुळे शेतकरी गुलाबाची लागवड कमी करत आहेत. नेहमीच्या तुलनेत ७० टक्केच लागवड केली जात असल्याचे प्रसिद्धी प्रमुख सागर भोसले यांनी सांगितले.

बाजारात पांढऱ्या, पिवळ्या इतर रंगांच्या फुलांनाही मागणी आहे. त्यांना लाल गुलाबापेक्षा जास्त भाव मिळत आहे. २० नगांना २०० रुपये भाव मिळाले.
- अरुण वीर, अध्यक्ष, अखिल फूलबाजार अडते असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT