online froud, crime, Pune, NEWS 
पुणे

सावधान! Redmi Mi7 प्रो स्वस्तात घेण्याचा फंडा पडला महागात; सायबर चोरट्यांनी गंडवलं

सकाळवृत्तसेवा

पुणे : रेडीमी कंपनीचा 'एमआय 7 प्रो' हा महागडा मोबाईल अवघ्या 2 हजार 999 रुपयांमध्ये देण्याचे आमिष दाखवित सायबर चोरट्यांनी एका किराणा दुकानदाराची आर्थिक फसवणूक केली. दुकानदाराने त्याच्या कामगारांसाठी स्वस्तात मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरट्यांनी दुकानदारालाच गंडा घातला. 

याप्रकरणी राजू चौधरी (वय 30 ,रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चौधरी यांचे आनंदनगर भागात किराणा माल विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानातील चार कामगारांना नवीन मोबाइल खरेदी करायचा होता. चौधरी यांच्या मोबाइलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन मेसेज आला होता. त्यामध्ये रेडमी कंपनीचा एमआय 7 प्रो हा मोबाईल दोन हजार 999 रुपये इतक्‍या किंमतीला आहे. हा मोबाईल घेण्यासाठी मेसेजमध्ये पाठविलेली लिंक उघडून त्यावर सविस्तर माहिती द्या, असे सांगण्यात आले होते. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चौधरी यांनी मेसेजमधील लिंक उघडून आवश्‍यक माहिती दिली. तसेच एका मोबाईल ऍपद्वारे चार मोबाईलच्या खरेदीसाठी 12 हजार रुपये ऑनलाईन माध्यमाद्वारे भरले. दरम्यान, फिर्यादी यांनी ती भरलेली लिंक पुन्हा उघडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी संबंधीत लिंक बंद असल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : पाच दिवसांच्या तेजीनंतर सोने उतरले, चांदीची चमकही झाली कमी; तुमच्या शहरातील ताजा भाव काय? जाणून घ्या

Mumbai Traffic: प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी बंद, 'असे' असतील पर्यायी मार्ग; अत्यावश्यक वाहनांसाठी विशेष सोय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे वित्तीय तूट नाही; उच्च न्यायालयामध्ये शासनाचे उत्तर, सरकार योजनेवर ठाम

Pune Weather: पुण्यात ढगाळ वातावरण; उन्हामुळे उकाडा वाढला, तापमान थोडेसे घटले

Stock Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; निफ्टी 70 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT