पिंपरी गाव - प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला संचलनाचा सराव करताना नव महाराष्ट्र विद्यालयाचे विद्यार्थी. 
पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिका, पोलिस आयुक्तालयासह शहरातील शाळा व विविध संस्था-संघटनांच्या वतीने रविवारी (ता. २६) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. २५) विविध शाळांमध्ये संचलनाच्या सरावासह सांस्कृतिक कार्यक्रमांचा जोरदार सराव सुरू होता. विद्यार्थ्यांमध्ये प्रजासत्ताक दिनाचा उत्साह संचारल्याचे पाहायला मिळाले.

चिंचवडमधील प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीसमोरील पटांगणात रविवारी सकाळी साडेसात वाजता ध्वजवंदनाचा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाची आयुक्तालयात शनिवारी जोरदार तयारी सुरू होती. ध्वजस्तंभाला रंगरंगोटी करण्यासह परिसरातील स्वच्छता करण्यात आली. सलामी देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी थांबण्याचे ठिकाण निश्‍चित करण्यासाठी इमारतीसमोरील पटांगणात फक्कीने आखणी करण्यात आली. यांसह सलामी देण्याचा सराव घेण्यात आला. अतिरिक्त आयुक्त अथवा उपायुक्त यांच्या हस्ते ध्वजवंदन होईल. 

महापालिका भवनासमोर महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते सकाळी पावणेआठ वाजता ध्वजवंदन होणार आहे. या वेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत; तसेच लष्कर, पोलिस, अग्निशामक दल व सुरक्षा विभागाचे जवानही उपस्थित राहणार आहेत. लष्करी जवानांकडून राष्ट्र धून वाजविली जाईल. महापालिका भवनासह क्षेत्रीय कार्यालय व करसंकलन कार्यालय येथेही ध्वजवंदन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : मुलांच्या हाती चाकू, गांजा कसा? आमदार रोहित पाटील यांचा पोलिसांवर सवाल

महत्त्वाची बातमी! पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल प्रति लिटर ३ रुपयांनी वाढले; दर कुणी वाढवले? जाणून घ्या सध्याची किंम्मत...

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir : ‘जुनं खोड’ ठरलं अजूनही भक्कम; हर्षवर्धन सदगीरचा डबल महाराष्ट्र केसरीपर्यंतचा प्रवास

Ancient Cave Found in Dapoli : कोकणचा नवा 'अजिंठा-वेरुळ'? दापोलीत निसर्गाच्या कुशीत सापडलं प्राचीन लेणं; दगडात आढळली कोरलेली देवमूर्ती

Brain Health : विसरभोळेपणा वाढतोय? पेशी वाढवणारे रोज खा ‘हे’ 6 सुपरफूड्स अन् मेंदू ठेवा शार्प

SCROLL FOR NEXT