सासवड, ता. २७ : सासवड (ता. पुरंदर) येथील पालखी तळावर ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन सोहळा उत्साहात साजरा झाला. ग्रामीण भागातील आणि समुद्रसपाटीपासून सर्वांत उंच असलेल्या या ध्वजस्तंभावर फ्लाइंग लेफ्टनंट शंतनू नरके यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व शिवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय जगताप होते.
सासवड येथील शिवस्मृती प्रतिष्ठान, सासवड नगरपालिका आणि राष्ट्रध्वज समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सासवड शहरातील विविध शिक्षण संस्थांच्या संचलन पथकांनी शिस्तबद्ध मानवंदना दिली. यात वाघीरे महाविद्यालय, पुरंदर शैक्षणिक संकुल, वाघीरे हायस्कूल, नगरपालिका शिक्षण मंडळ, श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल आणि गुरुकुल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या सोहळ्याप्रसंगी पालिकेचे गटनेते अजित जगताप, उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, विजय वढणे, नगरसेवक राजन जगताप, ज्ञानेश्वर जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, प्रदीप राऊत, सोपान रणपिसे, मयूर चौखंडे, नगरसेविका अर्चना जगताप, प्रियांका जगताप, स्मिता जगताप, राष्ट्रध्वज समितीचे सचिव अनिल उरवणे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष इस्माईल सय्यद यांनी केले, तर सूत्रसंचालन आणि संचलनाचे समालोचन सागर जगताप यांनी केले. आभार किरण पुरंदरे यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.