Republican Matang protests against Manoj Awhad murder case pune sakal
पुणे

मनोज आव्हाड हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन मातंग आघाडीचा मोर्चा

दलित समाजावरील अन्यायाकडे मुंडे यांचे दुर्लक्ष, राजीनाम्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनोज आव्हाड या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ रिपब्लिकन मातंग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी एल्गार मोर्चा काढण्यात आला. दलित समाजावरील अन्यायाकडे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केले.

साठे म्हणाले, बीड, उस्मानाबादसह महाराष्ट्रात मातंग समाजावर अन्याय अत्याचारांच्या घटना होत आहेत. परंतु सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या घटनांकडे गांभीर्याने बघत नाहीत. पीडित कुटुंबीयांना आधारही दिला नाही. त्यामुळे त्यांना सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून काम करण्याचा कोणताही अधिकार नाही. मुंडे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सचिव महिपाल वाघमारे, मातंग आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूरज तुपे, दलित युवक आंदोलन संस्थापक सचिन बगाडे, अनिल हतागळे, अंकल सोनवणे, चंद्रकांत बारस्कर, योगेश जाधव, संजय मस्के, खंडू पवार, महादेव गायकवाड, हनुमंत गायकवाड आदी कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Dates: देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा बिगुल वाजला! निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर; पाहा संपूर्ण कार्यक्रम...

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

37 वर्षं गायब आहे बॉलिवूडमध्ये नावाजलेली मराठी अभिनेत्री; ऋषी कपूर यांच्यावर केलेले आरोप !

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

SCROLL FOR NEXT