Research of Mangeshkar Hospital Benefits of Ayurvedic Medicine after Corona pune  sakal
पुणे

आयुर्वेदिक औषधांचा कोरोनानंतरही फायदा; दीनानाथ मंगेशकर रूग्णालय

पोस्ट कोवीड आजाराचे प्रमाण कमी; मंगेशकर रूग्णालयातील संशोधन

सम्राट कदम - सकाळ वृत्तसेवा

पुणे : नियमित औषधांबरोबरच आयुर्वेदिक औषधेही घेणाऱ्या कोरोना रुग्णांमध्ये, इतर रुग्णांच्या तुलनेत ‘पोस्ट कोवीड’ लक्षणांचे प्रमाण कमीअसल्याचे सिद्ध झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनातून ही बाब समोर आली आहे. डॉ.पंकज वंजारखेडकर, डॉ. गिरीश सरडे, डॉ. भारत पुरंदरे, डॉ.धनंजय केळकर यांचे हे संशोधन ‘जर्नल ऑफ आयुर्वेदिक अॅन्ड इन्टीग्रेटीव्ह मेडिसीन’ या शोधपत्रिकेत नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. कोरोना साथीच्या अगदी सुरवातीच्या कालखंडात जून-ऑगस्ट २०२० मध्ये ९९ रुग्णांवर आयुर्वेदिक औषधांचा वापर करण्यात आला होता.

कोरोनातून बरे झाल्यानंतर या रुग्णांची नऊ महिने नियमित आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातून हे निष्कर्ष हाती लागले आहे. डॉ. सरडे म्हणाले,‘‘आयुर्वेदाला आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. दोन वेगवेगळ्या कालखंडात केलेल्या या प्रयोगांमुळे आयुर्वेदिक औषधांना नवीन संशोधनाचा आधार मिळाला आहे. पहिल्या लाटेत केलेल्या वैद्यकीय चाचण्यांतून नेहमीच्या औषधाबरोबर आयुर्वेदिक औषधे घेतली तर तीन दिवस रूग्ण आधी बरा होत असल्याचे स्पष्ट झाले. बरा झालेल्या रुग्णाची पुढील नऊ महिने निरीक्षणे घेतल्यावर कोरोनानंतरचे दीर्घकाळ दिसणारी लक्षणे तुलनेने कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.’’ रूग्णालयात दाखल कोरोना रुग्णांवर हे संशोधन करण्यात आले आहे.

असे झाले संशोधन

  • कोरोनाबाधित ९९ रूग्ण आणि औषध विक्रेत्यांकडे मिळणाऱ्या आयुर्वेद औषधांपैकी दोन आयुर्वेदिक औषधांची निवड

  • त्यातील ६० रुग्णांना नेहमीच्या औषधांबरोबरच ही आयुर्वेदिक औषधे देण्यात आली

  • आयुर्वेदिक औषधे घेणाऱ्या व न घेणाऱ्या दोन्ही गटातील रुग्णाच्या लक्षणांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले गेले आहेत

  • बरे झाल्यानंतर रुग्णावर सलग नऊ महिने लक्ष ठेवण्यात आले

  • या काळात थकवा, ताप, अंगदुखी आदी लक्षणांची निरीक्षणे घेण्यात आली

    निष्कर्ष

आयुर्वेदिक औषधांचा अधिकची मात्रा घेणारे रूग्ण तीन दिवस आधी बरे झाले, तसेच कोरोनानंतर जाणवणाऱ्या दीर्घकालीन आजारांचे प्रमाणही या रुग्णांत कमी आहे.

मर्यादा

  • रुग्णाच्या लक्षणांच्या आधारे केलेले वैद्यकीय संशोधन आहे

  • त्यामुळे रक्ताच्या तपासण्या अथवा एच आर सी टी इत्यादी विश्लेषणात्मक बाबींची मर्यादा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

SCROLL FOR NEXT