Construction
Construction Sakal
पुणे

कोथरुडमधील बांधकामाच्या आवाजामुळे रहीवाशांची उडालीय रात्रीची झोप

सकाळ वृत्तसेवा

दिवसभर काम करुन थकून घरी आल्यावर रात्री शांतपणे आराम मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण जवळच सुरु असलेल्या बांधकामाच्या आवाजामुळे होणा-या त्रासामुळे आमची रात्रीची झोपच उडाली आहे.

कोथरुड - दिवसभर काम करुन थकून घरी आल्यावर रात्री शांतपणे आराम मिळावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण जवळच सुरु असलेल्या बांधकामाच्या (Construction) आवाजामुळे (Sound) होणा-या त्रासामुळे आमची रात्रीची झोपच (Sleep) उडाली आहे. अशी तक्रार कोथरुड (Kothrud) मधील मृत्युंज मंदिर परिसरात राहणा-या रहीवाशांनी केली आहे.

चिंतामणी अपार्टमेंट मध्ये राहणारे अनिकेत कुलकर्णी म्हणाले की, आमच्या सोसायटीच्या मागे हे बांधकाम चालु आहे. या कामामुळे उडणारी धुळ व ध्वनी प्रदुषणामुळे माझ्या मुलाला घशाला त्रास होत आहे. सातत्याने होणा-या झोपमोडीचा तब्येतीवर परिणाम होतोय. मुलांच्या परिक्षा जवळ आल्या आहेत. त्याचा त्रास मुलांना होतोय. संध्याकाळी सहा नंतर हे काम थांबवायला हवे.

सक्सेस स्केअर सोसायटीचे अध्यक्ष नागेशकुमार नलावडे म्हणाले की, रात्री अपरात्री सुरु असलेल्या कामाबद्दल वेळोवेळी पोलिसांकडे तक्रार केली आहे. १७ मार्च रोजी रात्री ३-१५ वाजता पोलिसांच्या वेबसाईटवर तक्रार केली. परंतु उपयोग होत नाही. रात्रीच्या वेळी शांतता भंग करणा-या या कामामुळे आमची झोपमोड झाली आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. आमची झोप हिरावण्याचा अधिकार यांना कोणी दिला आहे.

सक्सेस स्केअर सोसायटीत राहणारे सुनिल कडूसकर म्हणाले की, आमच्या इमारती शेजारीच हे काम सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या कामामुळे सगळ्यांनाच त्रास होतो आहे. पोलिसात तक्रार केली की मार्शल येतात. ते आहेत तोपर्यंत काम थांबवले जाते. परत काम सुरु होते. हे सघले खुपच त्रास दायक आहे. इतरांना त्रास होणार नाही अशा पध्दतीने, नियमानुसार काम करावे एवढीच सर्वांची अपेक्षा आहे.

मृत्युंजय मंदिरा जवळ किर्लोस्कर कंपनीच्या जागेत स्कॉन प्रोजेक्ट कंपनीच्यावतीने काम सुरु आहे. कर्वे रस्ता व मंदिरा मागील बाजु लगत असलेल्या सोसायट्यात राहणा-या रहीवाशांना याचा प्रामुख्याने त्रास होत आहे.

स्कॉन प्रोजेक्टचे या प्रकल्पाचे (इनचार्ज) प्रतिनिधी समाधान बच्छाव यांनी सांगितले की, आम्ही सकाळी ८ ते रात्री १० या वेळात येथे काम करतो. सर्व काम नियमानुसार सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT