पुणे

मांजरवाडीत दोनशे वृक्ष लागवडीचा संकल्प

CD

खोडद, ता. २ : मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे एक जून रोजी वाढदिवस असलेल्या ३४ ज्येष्ठ नागरिकांचा सामुदायिक वाढदिवस गावच्यावतीने साजरा करण्यात आला. चालू वर्षी पावसाळ्यात गावात २०० वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

ग्रामदेवता जगदंबा मातेच्या प्रांगणात हा वाढदिवस सोहळा संपन्न झाला. यावेळी वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावात झाडे लावण्यासाठी रोख रक्कम ग्रामपंचायतीकडे जमा केली.

यावेळी सरपंच सारिका गायकवाड, धोंडिभाऊ खुडे, दत्ता खंडागळे, हरिभाऊ थेटे, विलास मुळे, शोभा मुळे, पोपट मुळे, जनार्दन मुळे, भीमाजी थोरात, सदाशिव चौधरी, मच्छिंद्र थोरात, नामदेव मुळे, जिजाभाऊ खंडागळे, जालिंदर मुळे, नवनाथ वाघमारे, गोपीनाथ खंडागळे, रामदास नेहरकर, सुदाम थोरात, लक्ष्मण मुळे, श्रीपत मुळे, गंगाधर मुळे, रामदास खुडे, प्रभाकर थोरात, कारभारी थोरात, शिवाजी मुळे, किसन थोरात, लक्ष्मण मुळे, सी. डी. मुळे, शिवाजी मुळे, दत्तात्रेय मुळे, संपत गांडूळ, लहू मुळे, बबन मुळे, जयराम मुळे या सर्वांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन सन्मान केला.

याप्रसंगी जुन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माऊली खंडागळे, उद्योजक डी. आर. थोरात, अमोल मुळे, रवी थोरात, उपसरपंच संतोष मोरे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा मुळे, उदय खंडागळे, डॉ. विशाल थोरात, किरण थोरात, रमेश मुळे, प्रशांत गायकवाड, प्रताप थोरात, वाकोबा गायकवाड, विनायक मुळे, नवनाथ खंडागळे, अशोक गायकवाड, दीपेश मुळे, प्रकाश मुळे, संजय लोखंडे आदी उपस्थित होते.

मांजरवाडी गावात वड, पिंपळ, कडुनिंब, मोहगणी, बकुळ, रेनट्री, पुत्रंजीवा, अर्जुन सादडा या प्रजातींची २०० झाडे या पावसाळ्यात लावली जाणार आहेत. वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांनी यावेळी झाडे घेण्यासाठी पैसे देऊन आपला वाढदिवस अविस्मरणीय केला.

यावेळी माऊली खंडागळे, विनायक मुळे, संतोष मोरे, डी. आर. थोरात, रमेश मुळे, हरिश्चंद्र गायकवाड यांनी सर्वांना शुभेच्छा व्यक्त केल्या. आभार श्रीपत मुळे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

NEET 2026 Retest: NEET पुनर्परीक्षा अवघड: भौतिकशास्त्र-रसायनशास्त्राने विद्यार्थ्यांची कसोटी, कट-ऑफ व गुणवत्ता यादीवर परिणामाची शक्यता

PM Kisan eKYC : तांत्रिक अडचणींनी पीएम किसान ई-केवायसी ठप्प; हजारो शेतकरी हप्त्यापासून वंचित होण्याची भीती

SCROLL FOR NEXT